टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेमुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली, झालं असं की…

आशिया कप स्पर्धेनंतर आयसीसी टी20 वर्ल्डकपचे वेध लागणार आहेत. ही स्पर्धा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. असं असताना बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. कारण बीसीसीआयचं दरवर्षीचं ठरलेलं आयोजन फिस्कटण्याची शक्यता आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेमुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली, झालं असं की...
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेमुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली, झालं असं की...
| Updated on: Sep 16, 2025 | 7:11 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर 2026 या वर्षी या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. ही स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. त्यामुळे बीसीसीआय तयारीला लागली आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहे. मात्र यामुळे बीसीसीआयच्या डोक्याला ताप होणार आहे. कारण जानेवारी फेब्रुवारी या कालावधीत वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन केलं. तर मार्च ते मे या कालावधीत आयपीएलचं आयोजन होतं. त्यामुळे वुमन्स प्रीमियर लीगचं आयोजन करताना बीसीसीआयची डोकेदुखी वाढणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन जानेवारी महिन्यात करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 6 किंवा 8 जानेवारीपासून वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात होईल. अंतिम सामन्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही परंतु लीगमध्ये फक्त 22 सामने आहेत.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं यंदा चौथं पर्व आहे. त्यामुळे या स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये दर तीन पर्वानंतर मेगा लिलाव आयोजित केला जातो. वुमन्स प्रीमियर लीगमध्येही असे होऊ शकते. दरम्यान, डब्ल्यूपीएल लिलाव डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होत होता. मात्र यंदा वेळापत्रक पाहता नोव्हेंबर महिन्यात आयोजन केलं जाऊ शकतं. यंदा वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत नव्या संघाची एन्ट्री होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होतात. यामध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा समावेश आहे.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं पहिलं पर्व मुंबईत खेळवण्यात आला होता. दुसरा हंगाम बंगळुरू आणि दिल्लीमध्ये खेळवण्यात आला होता. मागच्या पर्वात वडोदरा, बंगळुरू, लखनऊ आणि मुंबई येथे सामने झाले होते. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दोन, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एक किताब जिंकला आहे. बीसीसीआयने वुमन्स प्रीमियर लीगचं आयोजन केल्यापासून भारतीय महिला संघासाठी चांगले दिवस आले आहेत. भारतीय संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघाशी सामना करताना दिसत आहे. सध्या भारतीय महिला संघाची नजर वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेकडे आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे.