Rahul Dravid यांची शिफारस, त्याने कोहलीला फॉर्ममध्ये आणलं, आता BCCI ने त्याच्याशी तोडलं नातं

कोण आहे तो? आता बोर्डाने आणखी काही कठोर पावल उचलली आहेत.

Rahul Dravid यांची शिफारस, त्याने कोहलीला फॉर्ममध्ये आणलं, आता BCCI ने त्याच्याशी तोडलं नातं
rohit-dravid
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 27, 2022 | 11:11 AM

मुंबई: T20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर BCCI फुल Action मोडमध्ये आहे. बीसीसीआयने मागच्या आठवड्यात तडकाफडकी निवड समिती बर्खास्त केली. आता बोर्डाने आणखी काही कठोर पावल उचलली आहेत. बोर्डाने मानसिक कंडीशनिंग कोच पॅडी अप्टन यांचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलेला नाही. वर्ल्ड कप सोबतच अप्टन यांना कॉन्ट्रॅक्ट संपला आहे.

अप्टन यांना कोच राहुल द्रविड यांनी निवडलं होतं. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने मानसिक कंडीशनिंग कोच अप्टन यांच्यासोबतचा करार वाढवलेला नाही.

का नियुक्ती केलेली?

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेआधी द्रविड यांच्या शिफारशीवर वर्ल्ड कपपर्यंत पॅडी अप्टन यांना करारबद्ध करण्यात आलं होतं. अप्टन बांग्लादेश दौऱ्यावर टीमसोबत जाणार नाहीत. खेळाडूंना दबाव जाणवून नये, त्यांना तणाव मुक्त ठेवण्यासाठी पॅडी अप्टन यांची नियुक्ती करण्यात आली होती.

काही प्रमाणात ते यशस्वी सुद्धा ठरले. विराट कोहलीला फॉर्ममध्ये आणण्यात त्यांनी मदत केली. पॅडी अप्टन यांनी केएल राहुल याच्यासोबत सुद्धा चर्चा केली. राहुलने अर्धशतक झळकवून फॉर्ममध्ये पुनरागमन केलं.

भारतीय टीमसोबत दुसरी इनिंग

टी 20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध केएल राहुल पुन्हा अपयशी ठरला. अप्टन यांची टीम इंडियासोबत दुसरी इनिंग होती. याआधी गॅरी कर्स्टन यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं. त्यावेळी भारताने 2011 सालचा वर्ल्ड कप जिंकला होता.

आयपीएलमध्ये काम करण्याचा अनुभव

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेयरडेव्हिल्स आता (दिल्ली कॅपिटल्स) आणि पुणे वॉरियर्ससोबत अप्टन यांनी काम केलय. बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बर्खास्त केली. त्यानंतर हा निर्णय घेतला.