
नवी दिल्ली : वेस्ट इंडिज विरुद्ध मुकाबल्याची वेळ जवळ आली आहे. 12 जुलैपासून डॉमिनिका येथे दोन टेस्ट मॅचची सीरीज खेळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु आहे. प्रत्येक खेळाडू मॅचसाठी स्वत:ला तयार करतोय. या दरम्यान विराट कोहलीच्या एका व्हिडिओची चर्चा सुरु आहे. विराट कोहलीने दाखवलेल मोठं मन, हे चर्चेत येण्यामागच कारण आहे.
विराट कोहलीने असं काय केलं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. डॉमिनिकामध्ये काही युवा क्रिकेटर्स विराट कोहलीला भेटण्यासाठी पोहोचले.
कोणाला निराश नाही केलं
काही क्रिकेटर्सना विराट कोहलीसोबत सेल्फी काढायचा होता. काहींना त्याची सही हवी होती. विराट कोहलीने कोणालाही निराश केलं नाही. विराटने भेटायला आलेल्या क्रिकेटर्सच्या इच्छा पूर्ण केल्या. आपल्या फेव्हरेट क्रिकेटर सोबत सेल्फी, ऑटोग्राफ मिळाल्याने युवा क्रिकेटर्सही आनंदात होते.
विराटने कोहलीने टेस्टमधील शेवटच शतक कधी झळकवलेलं?
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडिया अनेक युवा खेळाडूंना संधी देऊ शकते. पण सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या परफॉर्मन्सकडे असतील. विराट कोहलीच्या टेस्टमधील कामगिरीत घसरण झाली आहे. रेड बॉल क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा संघर्ष सुरु आहे. विराट कोहलीला परदेशात शतक झळकवून 55 महिने झालेत. डिसेंबर 2018 मध्ये पर्थ कसोटीत विराट कोहलीने परदेशात शेवटच शतक झळकावलं होतं.
वेस्ट इंडिजमध्ये 13 कसोटी सामन्यात विराटने किती धावा केल्या?
वेस्ट इंडिजमध्ये धावांचा डोंगर उभारण विराट कोहलीसाठी सोपं नसेल. वेस्ट इंडिजमध्ये मागच्या 13 कसोटी सामन्यात विराट कोहलीने 35.61च्या सरासरीने 463 धावा केल्या आहेत. एका मॅचमध्ये त्याने डबल सेंच्युरी जरुर झळकवली. पण त्यानंतर विराटला मोठी इनिंग खेळणं जमलेलं नाही. सराव सामन्यातही विराट कोहली अपयशी ठरला होता.