IPL 2023 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जास्त 3 कंजूस बॉलर, दोन भारतीयांचा समावेश!

टी-20 क्रिकेट प्रकारामध्ये बॉलर्सची धुलाई झालेली पाहायला मिळते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असे काही बॉलर्स आहेत. ज्यांनी सर्वात जास्त निर्धाव चेंडू टाकले आहेत.

IPL 2023 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जास्त 3 कंजूस बॉलर, दोन भारतीयांचा समावेश!
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 6:37 PM

मुंबई : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरूवात झाली असून आता पॉइंट टेबलमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये आता नव्या दमाच्या खेळाडूंनी आपली ताकद दाखवून दिली आहे. विशेषत: युवा खेळाडू बॉलर्सने खास प्रदर्शन केलं आहे. टी-20 क्रिकेट प्रकारामध्ये बॉलर्सची धुलाई झालेली पाहायला मिळते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असे काही बॉलर्स आहेत. ज्यांनी सर्वात जास्त निर्धाव चेंडू टाकले आहेत.

टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये 1400 हून अधिक डॉट बॉल टाकले आहेत. भुवनेश्वरने आयपीएलच्या 152 सामन्यांमध्ये आतापर्यंत 1,457 डॉट बॉल टाकलेत. आयपीएलमध्ये त्याने 158 विकेट घेतल्या असून तो आता सनराइजर्स हैदराबाद संघाकडून खेळताना आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याच्या बाबतीत रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विनने आयपीएलमध्ये 190 सामने खेळले असून आतापर्यंत अश्विनने 1,438 डॉट बॉल टाकले आहेत. अश्विन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. अश्विनच्या नावावर आयपीएलमध्ये 165 विकेट्स आहेत.

टी-२० मधील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजच्या सुनील नरेनचे नाव नेहमीच येते. सुनील नरेन हा जगातील अशा गोलंदाजांपैकी एक आहे ज्यांना खेळणे सर्वात कठीण मानले जाते. सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये सुनील नरेनचाही समावेश आहे. नरेनने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात 1,437 डॉट बॉल टाकले आहेत. नरेन हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. नरेनने आयपीएलमध्ये 154 सामन्यात 158 विकेट घेतल्या आहेत. यावेळीही नरेन फक्त कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे.

आरसीबी आणि राजस्थानमध्ये सामना चालू असून दोन्ही संघाची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (C), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (W), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.