AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Cricket League 2026: शिखर धवनच्या युपी स्टार्सने मारली उपांत्य फेरीत धडक, दोन संघाच्या पदरी निराशा

बिग क्रिकेट लीग स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीची लढत आणखी चुरशीची होताना दिसत आहे. आता शिखर धवनच्या संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण उर्वरित 3 जागांसाठी चुरस आहे.

Big Cricket League 2026: शिखर धवनच्या युपी स्टार्सने मारली उपांत्य फेरीत धडक, दोन संघाच्या पदरी निराशा
Big Cricket League 2026: शिखर धवनच्या युपी स्टार्सने मारली उपांत्य फेरीत धडक, दोन संघाच्या पदरी निराशाImage Credit source: Big Cricket League
| Updated on: Jun 09, 2026 | 5:42 PM
Share

बिग क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ असून त्यापैकी चार संघांना उपांत्य फेरीत जागा मिळणार आहे. असं असताना एका संघाची वर्णी उपांत्य फेरीत लागली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात यूपी ब्रृज स्टार्स संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आतापर्यंत खेळलेले चार सामने जिंकून यूपी ब्रृज स्टार्सने उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्कं केलं. आता उर्वरित तीन जागांसाठी सदर्न स्पार्टन्स, गुजरात डायमंड्स, मुंबई मरीन्स, नॉर्दर्न चॅलेंजर्स आणि एमपी टायगर्स यांच्यात लढत आहे.

बिग क्रिकेट लीग स्पर्धेत आतापर्यंत सहा दिवसात 9 सामने खेळले गेले आहे. या सामन्यात यूपी स्टार्सचं नाणं खणखणीत वाजलं आहे. या संघाने पाच सामन्यापैकी चार सामने खेळले आहेत. तसेच त्या चारही सामन्यात विजय मिळवून 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचा मार्ग खुला झाला आणि शिखर धवनच्या नेतृत्वात उपांत्य फेरी गाठणारा यूपी स्टार्स हा पहिला संघ ठरला आहे.

उपांत्य फेरीच्या उर्वरित तीन जागांसाठी सदर्न स्पार्टन्स, गुजरात डायमंड्स आणि मुंबई मरीन्स यांच्यात खऱ्या अर्थाने चुरस आहे. स्पार्टन्स आणि गुजरात डायमंड्सने प्रत्येकी तीन सामने खेळले आणि त्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 4 गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत स्पार्टन्स दुसऱ्या आणि गुजरात डायमंड्स तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई मरीन्सने आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे 2 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

दोन संघांना विजयाची प्रतीक्षा

या स्पर्धेत नॉर्दर्न चॅलेंजर्स आणि एमपी टायगर्स यांची कामगिरी काही खास राहिली नाही. या संघांना अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. नॉर्दर्न चॅलेंजर्सने आतापर्यंत खेळलेले तीन सामने गमावले. तर एमपी टायगर्सने दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात पराभव झाला. त्यामुळे हे दोन्ही संघ पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. उपांत्य फेरीपूर्वी सहा सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे या संघांना उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 12 जूनला होणार आहे. तर अंतिम सामना 13 जूनला होईल.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...