Cricket News : 4 वर्षांपूर्वीच खेळला, आता पुन्हा त्याच वयोगटात! क्रिकेटमधील हा प्रकार पाहून BCCI सुद्धा चक्रावेल

बिहार क्रिकेटमध्ये वयाच्या कथित गैरप्रकाराचा आरोप समोर आला आहे. 2020-21 मध्ये अंडर-16 संघाकडून खेळलेला खेळाडू 2026-27 मध्ये अंडर-19 संघात निवडला गेल्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. आडनाव बदलल्याचाही आरोप आहे.

Cricket News : 4 वर्षांपूर्वीच खेळला, आता पुन्हा त्याच वयोगटात! क्रिकेटमधील हा प्रकार पाहून BCCI सुद्धा चक्रावेल
cricket age fraud
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 10:51 PM

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतातील वयोगट क्रिकेटमध्ये वयासंबंधी मोठा घोटाळा पुन्हा एका समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी हा घोटाळा बिहार क्रिकेटमध्ये घडला आहे. बिहार क्रिकेटवर वयाशी संबंधित अनियमिततेचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राप्त अहवालानुसार बेगुसराई येथील एक युवा क्रिकेटर २०२०-२१ मध्ये १६ वर्षांखालील गटात बिहारकडून खेळला होता, त्याची आता पुन्हा एकदा १९ वर्षांखालील संघातही निवड झाली आहे. त्यामुळे साहजीकच असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, चार वर्षांपूर्वी १६ वर्षांच्या वयोगटात क्रिकेट खेळलेला खेळाडू हा २०२६-२०२७ मध्ये १९ वर्षांचा कसा?

Loading...

क्रिकब्लॉगरच्या एका वृत्तानुसार, असाही आरोप आहे की २०२०-२१ मधील स्पर्धेच्या हंगामादरम्यान संबंधित क्रिकेटपटूचे आडनाव वेगळे होते आणि आता ते वेगळे करण्यात आले आहे म्हणजेच बदलण्यात आले आहे. सूत्रांनी असाही दावा केला आहे की, हा कथित बदल त्याच्या आधार कार्डच्या नोंदींमध्येही दिसून आला आहे. बिहार क्रिकेटच्या कोणत्याही अधिकाऱ्याने अद्याप या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, ज्युनियर क्रिकेटमधील वयाशी संबंधित अशा घटनांची अनियमितता केवळ बिहारपुरती मर्यादित नाही तर इतर राज्यांमध्येही त्याचा परिणाम दिसला आहे.

क्रिकेटप्रेमी निराश

दरम्यान, त्यामुळे सूत्रांनी असाही दावा केला आहे की, सराव सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करूनही प्रतिभावान क्रिकेटपटूंना संधी दिली जात नाही. त्यामुळे जर खेळाडूंच्ा गुणवत्तेला प्राधान्य दिले जात नसेल, तर चाचण्या घेण्याचा उपयोग तरी काय? या सर्व प्रक्रियेमध्ये प्रश्न विचारायचे तरी कोणारा असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे ज्युनियर क्रिकेट निवडीतील पारदर्शकता, कागदपत्रातील विश्वासार्हता आणि जबाबदारी यावर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. जर हे असेच चालू राहिले, तर प्रतिभावान खेळाडू मागे राहून शेवटी भारतीय क्रिकेटचेच नुकसान होईल, अशा निरशाजनक प्रतिक्रिया क्रिडाप्रेमींनी दिल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us