IPL 2023 Auction साठी ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच रजिस्ट्रेशन, त्याच्यावर पैशांचा पाऊस पडणार हे निश्चित

| Updated on: Nov 28, 2022 | 7:45 PM

IPL 2023 लिलाव प्रक्रियेसाठी एका मोठ्या खेळाडूने नाव नोंदवलय....

IPL 2023 Auction साठी या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच रजिस्ट्रेशन, त्याच्यावर पैशांचा पाऊस पडणार हे निश्चित
Australian Team
Image Credit source: Cricket Australia
Follow us on

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढच्या सीजनसाठी जोरात तयारी सुरु आहे. फ्रेंचायजीने रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची लिस्ट जारी केली आहे. पुढच्या महिन्यात लिलाव होईल. त्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी एका मोठ्या खेळाडूने नाव नोंदवलय. त्याच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जाऊ शकतो.

या खेळाडूच नाव आहे,….

या खेळाडूच नाव आहे, कॅमरुन ग्रीन. ऑस्ट्रेलियाच्या या प्लेयरने आयपीएलच्या पुढच्या सीजनसाठी नाव रजिस्टर केलय. ग्रीनने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिलाय.

ग्रीन काय म्हणाला?

ग्रीन ने cricket.com.au शी बोलताना सांगितलं की, “मी आयपीएलच्या पुढच्या सीजनसाठी रजिस्ट्रेशन केलय. हा एक चांगली संधी आहे. मी बऱ्याच जणांकडून आयपीएलबद्दल ऐकलय. सगळेच या टुर्नामेंटच कौतुक करतात. तिथे चांगले कोचेस आहेत. वर्ल्ड मधील चांगले कोचेस आयपीएलमध्ये असतात”

भारतात आपली क्षमता दाखवून दिलीय

ग्रीनने मागच्या महिन्यात भारत दौऱ्यात आपल्या आक्रमक बॅटिंगचा नमुना दाखवला. त्याने डेविड वॉर्नरसह एरॉन फिंचच्या जागी ओपनिंग केली होती. तीन मॅचच्या टी 20 सीरीजमध्ये त्याने दोन हाफ सेंच्युरी झळकावल्या. कॅमरुन ग्रीनकडे वेगाने धावा बनवण्याची क्षमता आहे. गोलंदाजी करताना विकेटही घेऊ शकतो.

असे प्लेयर प्रत्येक टीमला हवेत

ग्रीन लिलावात उतरलाय. त्याच्यावर फ्रेंचायजी मोठी बोली लावतील. टी 20 क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर्सच एक वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक टीमला ऑलराऊंडर्स आपल्या टीममध्ये हवे आहेत. बॅटिंग बरोबर वेळेला ते चेंडूनेही योगदान देऊ शकतात.