
मुंबई: आशिया कप 2022 मध्ये (Asia cup) श्रीलंकेने रोमांचक सामन्यात बांगलादेशला हरवलं. श्रीलंकेने फक्त दोन विकेट राखून विजय मिळवला. बांगलादेशने (SL vs BAN) प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 183 धावा केल्या. श्रीलंकन संघाने चार चेंडू बाकी राखून विजय मिळवला. या विजयानंतर श्रीलंकेच्या एका खेळाडूची मैदानावरील कृती चर्चेचा विषय बनली आहे. श्रीलंकेच्या चामिका करुणारत्नेने मैदानावर असं काही केलं की, 2018 निदास ट्रॉफीच्या (Nidas Trophy) आठवणी ताज्या झाल्या. श्रीलंकेला शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर एक धावा काढली. दुसऱ्या चेंडूवर असिता फर्नांडोने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर दोन धावा निघाल्या. त्याचवेळी पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला. अतिरिक्त धाव खात्यात जमा झाल्यामुळे श्रीलंकेचा विजयी ठरला.
त्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. कारण त्यांच्यासाठी हा विजय खास होता. सामन्याआधी दोन्ही संघांचे कोच, खेळाडूंमध्ये शाब्दीक लढाई रंगली होती.
The next world war will be over countries picking up their side during #BANvSLpic.twitter.com/My4HRVACDs
— Rofl Gandhi 2.0 ? (@RoflGandhi_) September 1, 2022
चामिका करुणारत्नेने या विजयाचं आपल्या स्टाइल मध्ये सेलिब्रेशन केलं. करुणारत्नेने नागिन डान्स दाखवला. त्याने एक प्रकारने जुना हिशोब चुकता केला. या पराभवासह बांगलादेशच आशिय कप मधील आव्हान संपुष्टात आलय.
2018 – Nagin Celebration by Bangladesh after knocking out Sri Lanka from Nidahas Trophy.
2022 – Nagin Celebration by Chamika Karunaratne after knocking Bangladesh out of Asia Cup. pic.twitter.com/Po7yhyeAb5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 1, 2022
श्रीलंकेत 2018 साली निदास ट्रॉफीच आयोजन केलं होतं. या स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ सहभागी झाले होते. फायनलची शर्यत रंगतदार होती. बांगलादेशने त्यावेळी 16 मार्चला झालेल्या सामन्यात श्रीलंकेला दोन विकेटने हरवलं होतं. बांगलादेशची टीम श्रीलंकेला नमवून फायनल मध्ये पोहोचली होती. या विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानात नागिन डान्स केला होता. आता चार वर्षानंतर श्रीलंकेने बांगलादेशला नॉकआऊट फेरीतून बाहेर केलं आहे. त्यामुळे करुणारत्नेने आता तसाच नागिन डान्स केला. त्याने बांगलादेशच्या जखमेवर एकप्रकारे मोठी चोळलं. श्रीलंकेने चार वर्षापूर्वीच्या पराभवाचा हिशोब चुकता केला. सामन्याआधी दोन्ही टीम्सकडून विजयाचे दावे करण्यात येत होते. शाब्दीक द्वंद सुरु होतं. त्याचे पडसाद मैदानातही दिसले.