
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे कायमच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. टीम इंडिया कायमच आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये महामुकाबला खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामना कोण जिंकणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. मात्र समजा हा सामना टाय झाला? तर कोणत्या संघाला विजेता ठरणार? कोणत्या नियमानुसार निकाल लावला जाणार? आयसीसीचे नियम काय सांगतात? हे जाणून घेऊयात.
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना टाय झाला तर सुपर ओव्हरद्वारे विजयी संघ निश्चित केला जाईल.आयसीसीच्या नियमानुसार, सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरद्वारे निकाल लावण्यात येईल. तसेच सुपर ओव्हरचा जोवर निकाल लागत नाही, तोवर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.सोप्या शब्दात सांगायतं तर पहिली सुपर ओव्हरही टाय झाली, तर पुन्हा सुपर ओव्हर होईल. हे असंच सुरु राहिल जोवर सुपर ओव्हरचा निकाल लागत नाही.
दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतील बाद फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहेत. पाऊस किंवा अन्य कारणामुळे मुख्य दिवशी सामना न झाल्यास राखीव दिवशी सामना होईल. डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल लावण्यासाठी किमान 25 ओव्हरचा खेळ होणं बंधनकारक असतं. तसेच साखळी फेरीतील सामन्याचा डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल काढण्यासाठी किमान 20 ओव्हरचा खेळ होणं बंधनकारक असतं. तसेच साखळी फेरीतील सामन्याचा निकाल लागू न शकल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट दिला जातो.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.