IND vs BAN: अखेर 3 वर्षानंतर Cheteshwar pujara ला टेस्टमध्ये मिळालं मोठं यश

IND vs BAN: सततच्या अपयशाला मागे टाकून चेतेश्वर पुजाराने सिद्ध केलं.

IND vs BAN: अखेर 3 वर्षानंतर Cheteshwar pujara ला टेस्टमध्ये मिळालं मोठं यश
Cheteshwar pujara
Image Credit source: BCCI
| Updated on: Dec 16, 2022 | 4:11 PM

चटोग्राम: टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळानंतर शतक ठोकलय. बांग्लादेश विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पुजाराने शतक झळकावलं. 2019 नंतर पुजाराने झळकावलेलं हे पहिलं शतक आहे. पहिल्या डावात पुजाराची शतकाची संधी हुकली होती. पुजाराने 130 चेंडूत नाबाद 102 धावा फटकावल्या. पुजाराच्या शतकानंतर भारताने डाव घोषित केला. पुजाराच कसोटीमधील हे वेगवान शतक आहे. भारताने 2 विकेटवर 258 धावांवर डाव घोषित केला.

तीन वर्षानंतर संपली प्रतिक्षा

पुजाराने 52 इनिंगनंतर शतक झळकावलं. त्याचं कसोटी करिअरमधील हे 19 व शतक आहे. पुजाराने 2019 साली सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकलं होतं. तेव्हापासून शतकासाठी पुजाराची प्रतिक्षा सुरु होती. पहिल्या डावात तो शतकाच्या जवळ पोहोचला. पण 90 रन्सवर आऊट झाला.

गिलसोबत जमली जोडी

पुजाराशिवाय टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने सुद्धा शतक झळकावलं. दोघांच्या शतकामुळे टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. संघाची धावसंख्या 183 असताना गिल आऊट झाला. त्यानंतर पुजाराच्या शतकाची प्रतिक्षा होती. त्याने आक्रमक अंदाज दाखवला. पुढे येऊन त्याने शॉट मारले. विराट कोहलीसोबत अर्धशतकी भागीदारी केली. विराटने 29 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या.

चेतेश्वर पुजारा उपकर्णधार

पुजाराला या कसोटीसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलय. रोहित शर्माला दुखापत झालीय. त्यामुळे केएल राहुल टीमच नेतृत्व करतोय. पुजाराला उपकर्णधार बनवण्यात आलय.