Cricketer David Warner : वॉर्नरला आऊटचा इशारा, सामना पाहणाऱ्या लेकीच्या डोळ्यात तरळले अश्रू, पाहा तो भावूक क्षण

| Updated on: Apr 17, 2022 | 4:28 PM

आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात तिसऱ्या पंचाना वॉर्नरकडे बोट दाखवलं. यावेळी उपस्थित एका मुलीच्या लक्षात आलं की तो वॉर्नर आऊट असल्याचं म्हणतोय. याचवेळी त्या मुलीच्या डोळ्यातून आश्रू तरळे. नेमकं काय झालं वाचा...

Cricketer David Warner : वॉर्नरला आऊटचा इशारा, सामना पाहणाऱ्या लेकीच्या डोळ्यात तरळले अश्रू, पाहा तो भावूक क्षण
डेव्हिड वॉर्नर
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) शनिवारी पूर्ण रंगात दिसला. वॉर्नरने आरसीबीविरुद्धचे (RCB) अर्थशतक अवघ्या 29 चेंडूत पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन खेळाडू एकदा मैदानात उतरला की भल्याभल्यांना घाम फुटतो असं म्हणताति. भलेभले खेळाडू गोलंदाजी करताना चार वेळेस विचार करतात. अनेकांना धडकी भरते. त्याचं कारण देखील तसंच आहे. कारण, वॉर्नरमध्ये एकट्याने सामना जिंकण्याची क्षमता आहे. त्या त्याच्या विशेष कौशल्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. काल दिल्ली कॅपिटल्सचा सामना सुरु असताना असंच एक दृष्य उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात टिपलं गेलं. वॉर्नर पूर्ण जोमात खेळत होता. लाँग शॉट्स मारत होता. पण दिनेश कार्तिकने त्याच्यासाठीही वेळ ठरवला. तिसऱ्या पंचाना वॉर्नरकडे बोट दाखवलं. यावेळी उपस्थित एका मुलीच्या लक्षात आलं की तो वॉर्नर आऊट असल्याचं म्हणतोय. याचवेळी त्या मुलीच्या डोळ्यातून आश्रू तरळे.

नेमकं काय झालं?

चेंडू स्टंपवर होता आणि लेग-स्टंप आदळत असल्याचे दिसल्यानंतर दिनेश कार्तिकने डीआरएस अंपायरने रिव्ह्यू घेतला होता. प्रथम पंच बोलावतील आणि वार्नरला नाबाद घोषित केले जाईल, असे वाटत होते. पण, तिसऱ्या पंचाने त्याला बाद घोषित केलं. त्यानंतर काय होते. कॅमेऱ्याची नजर वॉर्नरच्या मुलींवर पडताच ती चांगलीच निराश झाली. त्याची एक मुलगी रडायला लागली. वॉर्नरला तीन मुली आहेत. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तो त्याच्या तिन्ही मुलींचे फोटो अनेकदा पोस्ट करत असतो.

काल दिल्लीचा पराभव

काल आरसीबीच्या विजयाचं सर्वाधिक श्रेय दिनेश कार्तिकला जातं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या पाच बाद 92 धावा झाल्या होत्या. त्यावेळी दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. कठीण परिस्थिती होती. पण दिनेश कार्तिकने कुठलाही दबाव न घेता आपला खेळ सुरु ठेवला. त्याने 34 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार होते. सहाव्या विकेटसाठी दिनेश आणि शाहबाज अहमदमध्ये 55 चेंडूत नाबाद 97 धावांची भागीदारी झाली. दिनेशच्या या वादळी खेळीमुळेच आरसीबीला 189 ही डोंगराएवढी धावसंख्या उभारता आली. दिनेशच्या आधी फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि अनुज रावत हे आघाडीचे तीन फलंदाज लवकर बाद झाले होते. पण मॅक्सवेलने कुठलाही दबाव न घेता फटकेबाजी सुरु ठेवली. त्याने 34 चेंडूत 55 धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकार होते. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा 16 धावांनी पराभव केला.

इतर बातम्या

बाळाचं नाव सुचवा अन् सात लाख रूपये मिळवा, ‘बेबी नेमर’सारखी सुखाची नोकरी नाही!

Chhagan Bhujbal : भक्तीचे नव्हे, हे शक्तीचे राजकारण, भुजबळांचा आसूड; नाशिकमध्ये धारीवाल हॉस्पिटल-रिसर्च सेंटरचे उदघाटन

Jahangirpuri Violence : हिंसाचारानंतर दिल्लीला छावणीचे स्वरूप; जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी आणखी 5 CRPF कंपन्या दिल्लीला रवाना