AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK टीम मॅनेजमेंटने खेळली मोठी चाल, 2008 च्या आयपीएलचा तो नियम परत लागू करण्याची मागणी, जाणून घ्या

धोनीला आयपीएल 2025 च्या आयपीएलमध्ये खेळवण्यासाठी सीएसकेची तयारी आहे. कारण यंदाच्या आयपीएलआधी मुंबईमध्ये सर्व आयपीएल फ्रँचायसींची बैठक पार पडली. चेन्नई सुपर किंग्जने 16 वर्षांपूर्वीचा एक नियम लागू करावा अशी मागणी केली.

CSK टीम मॅनेजमेंटने खेळली मोठी चाल, 2008 च्या आयपीएलचा तो नियम परत लागू करण्याची मागणी, जाणून घ्या
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 01, 2024 | 9:44 PM
Share

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार काही नाही हा मोठा प्रश्न चाहत्यांना आहे. मात्र धोनीला आयपीएल 2025 च्या आयपीएलमध्ये खेळवण्यासाठी सीएसकेची तयारी आहे. कारण यंदाच्या आयपीएलआधी मुंबईमध्ये सर्व आयपीएल फ्रँचायसींची बैठक पार पडली. मीडिया रिपोर्टनुसार चेन्नई सुपर किंग्जने 16 वर्षांपूर्वीचा एक नियम लागू करावा अशी मागणी केली. तो नियम काय आहे ज्यासाठी सीएसकेने पुन्हा लागू करण्याची मागणी केली. या नियमाला सनरायजर्स हैदराबाद संगाची मालकीण काव्या मारन हिने विरोध दर्शवला. नेमकं काय झालं जाणून घ्या.

या बैठकीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल 2008 चा नियम यंदाही लागू करावा अशी मागणी केली. या नियमानुसार जर एखाद्या खेळाडूने निवृत्ती घेतल्यावर पाच वर्षे पुर्ण झाल्यावर त्याचा अनकॅप खेळाडूंच्या यादीमध्ये समावेश होते. सीएसकेने ही अट का केली असावी? सीएसकेला याचा काय फायदा होणार जाणून घ्या.

सीएसकेचा माजी खेळाडू महेंद्र सिंह धोनीला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्षा पूर्ण होत आहेत. जर तो नियम लागू केला तर धोनीचा अनकॅप खेळाडूंमध्ये समावेश होणार, याचा पूर्ण फायदा सीएसकेला होणार आहे. खेळाडू रिटेन करताना धोनीला अनकॅप खेळाडू म्हणून रिटेन करू शकतात. मात्र याला काव्या मारन हिने विरोध दर्शवला. या निर्णयाला काव्याने विरोध का दर्शवला ते समजून घ्या.

काव्या मारन काय म्हणाली?

जर कोणत्याही निवृत्त खेळाडूला अनकॅप खेळाडू म्हणून रिटेन केलं तर तो त्या खेळाडूचा अपमान आहे. उलट अशा खेळाडूंना रिटेन करण्याऐवजी लिलावामध्ये उतरायला हवं. लिलावात अशा खेळाडूंना उतरवलं तर त्यांना त्यांची योग्य किंमत मिळेल, असं काव्या मारनने म्हटलं आहे.

दरम्यान, आता आयपीएलच्या लिलावासाठी बीसीसीआय यावर काय उपाय शोधून काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू