IND vs PAK: Virat Kohli कडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाज म्हणाला, जय श्री राम, आता पुढचं लक्ष्य मंदिर

IND vs PAK: जय श्री राम म्हणणारा, कोण आहे हा पाकिस्तानी गोलंदाज?

IND vs PAK: Virat Kohli कडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाज म्हणाला, जय श्री राम, आता पुढचं लक्ष्य मंदिर
विराट कोहली
Image Credit source: social
| Updated on: Oct 24, 2022 | 2:10 PM

मेलबर्न: भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) हरवून टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) अभियानाची दमदार सुरुवात केली आहे. भारताने 4 विकेटने पाकिस्तानला हरवलं. दीवाळीच्या एक दिवस आधी टीम इंडियाने देशवासियांना जल्लोषाची संधी दिली. भारताच्या या विजयाचा हिरो राहिला विराट कोहली. (Virat Kohli) मेलबर्नच्या मैदानात टीम इंडियाचे अन्य टॉप फलंदाज अपयशी ठरले. त्याच ठिकाणी विराटने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 53 चेंडूत नाबाद 82 धावा फटकावल्या.

माझं पुढचं लक्ष्य राम मंदिर

टीम इंडियाने संपूर्ण देशाला एकदिवस आधीच दिवाळी साजरी करण्याची संधी दिली. या दरम्यान एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझं पुढचं लक्ष्य राम मंदिर पाहण आहे. त्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला येणार असं त्याने म्हटलं आहे.

टेस्टमध्ये किती विकेट काढल्या?

पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाने सोमावारी टि्वट करुन त्यात जय श्री राम म्हटलं आहे. संपूर्ण विश्वाला त्याने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी 61 कसोटी आणि 18 वनडे सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दानिश कनेरियाच्या नावावर 261 टेस्ट आणि वनडेमध्ये 15 विकेट आहेत.

विराटची तुफान बॅटिंग

पाकिस्तानने काल पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 159 धावा केल्या. टीम इंडियाने 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य गाठलं. विराट कोहली टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने नाबाद 82 धावा फटकावल्या. दुसऱ्याबाजूने हार्दिक पंड्याने 37 धावा काढून त्याला साथ दिली.