DC vs KKR, IPL 2022: फिंचची दांडी उडवली चेतन सकारियाने पण खूश झाली ऋषभची गर्लफ्रेंड, पहा VIDEO

| Updated on: Apr 28, 2022 | 8:50 PM

DC vs KKR, IPL 2022: आज डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने दिल्लीकडून आयपीएल डेब्यु केला. या 24 वर्षांचाय युवा गोलंदाजाने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये एरॉन फिंचला तंबूचा रस्ता दाखवला.

DC vs KKR, IPL 2022: फिंचची दांडी उडवली चेतन सकारियाने पण खूश झाली ऋषभची गर्लफ्रेंड, पहा VIDEO
isha negi-chetan sakaria
Image Credit source: ipl/twitter
Follow us on

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत क्रिकेट बरोबरच क्रिकेटपटूंच्या पत्नी, गर्लफ्रेंड यांची सुद्धा तितकीच चर्चा होते. स्टेडियममध्ये क्रिकेटपटूची पत्नी किंवा गर्लफ्रेंड हजर असेल, तर स्टेडियममधल्या कॅमेऱ्याचं तिच्याकडे विशेष लक्ष असतं. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (Dc vs KKR) सामना सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये एक खास पाहुणी उपस्थित आहे. तिच्याकडे कॅमेऱ्याचं विशेष लक्ष आहे. ही खास पाहुणी आहे इशा नेगी (Isha Negi). तुम्ही म्हणाला आता कोण ही इशा नेगी?. इशा नेगी ही भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतची (Rishabh pant) गर्लफ्रेंड आहे. आज दिल्ली विरुद्ध कोलकाता हा खास सामना पाहण्यासाठी ती वानखेडेवर आली आहे. सहाजिकच मग कॅमेऱ्याचं तिच्याकडे लक्ष असणार. कालच्या गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात नताशाकडे कॅमेरा सारखा फिरत होता. आज इशा नेगीकडे सोशल मीडिया लक्ष ठेवून आहे.

सकारियाची सेलिब्रेशनची स्टाइलही खास

आज डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने दिल्लीकडून आयपीएल डेब्यु केला. या 24 वर्षांचाय युवा गोलंदाजाने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये एरॉन फिंचला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने अवघ्या 3 रन्सवर खेळणाऱ्या फिंचच्या दांड्या गुल केल्या. सकारियाची सेलिब्रेशनची स्टाइलही खास होती. ज्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. सकारियाने विकेट घेतल्यानंतर इशाने आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन केलं. ती दिल्लीच्या टीमला चिअर करण्यासाठी आली आहे. चेतन सकारियने दिल्लीचे सात सामने झाल्यानंतर आज डेब्यु केला. खलील अहमद आणि सर्फराझ खान आज दोघांना बाहेर बसवण्यात आलं आहे.

दिल्लीचा डाव अडचणीत

मागच्या सीजनमध्ये चेतन सकारिया राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. तिथे त्याने 14 सामन्यात 30.43 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या होत्या. आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 4.2 कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं आहे. केकेआरची आज चांगली सुरुवात झाली नव्हती. 35 रन्समध्ये त्यांचे चार विकेट गेले होते.

डेब्यु करणाऱ्या चेतन सकारियाने पहिल्याच ओव्हरमध्ये फिंचच्या अशा उडवल्या दांड्या पहा VIDEO

पण कॅप्टन श्रेयस अय्यर आणि नितीश राणाने डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. पण श्रेयस अय्यर 42 रन्सवर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर यष्टीपाठी कॅचआऊट झाला.