
नवी मुंबई | वू्मन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा आणि निर्णायक टी 20 सामना हा रविवारी 7 जानेवारी रोजी पार पडला. या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाने पहिला सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियासाठी 3 सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना महत्त्वाचा होता. ऑस्ट्रेलियाने करा या मरा स्थितीत हा सामना जिंकला आणि मालिकेत बरोबरी साधली.
दीप्ती शर्मा हीने केलेल्या 30 धावांच्या जोरावर टीम इंडियाला 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 130 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 131 धावांचं आव्हान हे 1 ओव्हर राखून आणि 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मानेच सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. या सामन्यात दीप्ती शर्मा हीने इतिहास रचला. दीप्तीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 29 धाव घेताच इतिहास घडवला.
दीप्ती शर्माने टी 20 मध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या. तसेच याआधीच दीप्तीने विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं. दीप्ती अशाप्रकारे टीम इंडियाकडून 100 विकेट्स आणि 1 हजार धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. दीप्तीला दुसऱ्या टी 20 सामन्याआधी 1 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी 29 धावांची गरज होती. दीप्तीच्या नावावर 102 सामन्यांमधील 72 डावात 971 धावांची नोंद होती. दीप्तीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 29 वी धाव पूर्ण करताच 1 हजार धावा पूर्ण केल्या.
🚨 Milestone Alert 🚨
Congratulations to Deepti Sharma 👏 👏
She becomes the first #TeamIndia cricketer (in women’s cricket) to surpass 1⃣0⃣0⃣0⃣ runs and take 1⃣0⃣0⃣ wickets in T20Is. 🙌 🙌
Follow the Match ▶️ https://t.co/ar0sCktbHa#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/glWDaLOMwW
— BCCI Women (@BCCIWomen) January 7, 2024
दीप्तीने आधी बॅटिंग करताना 27 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. तसेच त्यानंतर 4 ओव्हरमध्ये 22 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. दीप्तीने एलिसा हीली आणि बेथ मूनी या दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, किम गर्थ आणि मेगन शूट.