AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIND vs WAUS 3rd T20I | ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियापैकी कोण जिंकणार तिसरा सामना?

India Women vs Australia Women 3rd T20I | टीम इंडियाने टी 20 मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेतली. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे तिसरा सामना हा चढाओढीचा होणार आहे. सामना केव्हा, कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर.

WIND vs WAUS 3rd T20I | ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियापैकी कोण जिंकणार तिसरा सामना?
| Updated on: Jan 08, 2024 | 2:49 PM
Share

नवी मुंबई | वूमन्स ऑस्ट्रेलिया टीमने रविवारी 7 जानेवारी रोजी टीम इंडियावर दुसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने पहिला सामना हा 9 विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा कांगारुंसाठी करो या मरो असा होता. ऑस्ट्रेलिया या आरपारच्या लढाईत यशस्वी ठरली. ऑस्ट्रेलियाने अवघ्या 4 विकेट्स गमावून 131 धावांचं आव्हान हे 19 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दोन्ही संघांना मालिका विजयाची बरोबरीची संधी आहे. यामुळे तिसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. हा तिसरा आणि अंतिम सामना केव्हा आणि कुठे होणार हे जाणून घेऊयात.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना केव्हा?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना हा मंगळवारी 9 जानेवारी रोजी होणार आहे.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना कुठे?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना हा नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना किती वाजता सुरु होणार?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स नेटवर्क 18 चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच डीडी फ्री डीशवर डीडी भारती या वाहिनीवर सामना मोफत पाहायला मिळेल.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपद्वारे मोफत पाहता येईल.

टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तीतस साधू, मन्नत कश्यप, सायका इशाक, कनिका आहुजा, यास्तिका भाटिया आणि मिन्नू मणी.

ऑस्ट्रेलिया टीम | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शुट, डार्सी ब्राउन, हीदर ग्रॅहम, अलाना किंग, जेस जोनासेन आणि किम गर्थ.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.