WIND vs WAUS 2nd T20I | टीम इंडियाला मालिका विजयाची संधी

India Women vs Australia Women 2nd T20i Match | वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे.

WIND vs WAUS 2nd T20I | टीम इंडियाला मालिका विजयाची संधी
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 5:00 PM

नवी मुंबई | वूमन्स टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकमेव कसोटी सामना जिंकत जोरदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला क्लिन स्वीप देत जोरदार मुसंडी मारली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत विजयाने सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. इतकंच नाही, तर टीम इंडियाला कांगारुंचा एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा वचपा घेण्याचीही संधी आहे.

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग 3 सामने गमावल्यानंतर पहिला सामना जिंकण्यात यश आलं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वनडे सीरिजमध्ये अनुक्रमे 6 विकेट्स, 3 धावा आणि 190 धावा अशा फरकाने पराभूत केलं. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्याच टी 20 सामन्यात कांगारुंचा 9 विकेट्सने विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली.

त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना हा आज 7 जानेवारी रोजी होणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो असा असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया मालिका विजयाच्या तयारीने सज्ज आहे. तर ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावताना दिसणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया सामन्यासह मालिका जिंकते, की कांगारु विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधतात याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या टी 20 आधी टीम इंडियाचा जोरदार सराव

टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तीतस साधू, मन्नत कश्यप, सायका इशाक, कनिका आहुजा, यास्तिका भाटिया आणि मिन्नू मणी.

ऑस्ट्रेलिया टीम | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शुट, डार्सी ब्राउन, हीदर ग्रॅहम, अलाना किंग, जेस जोनासेन आणि किम गर्थ.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.