Cricket | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला मिळाली संधी?

India vs England | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटीत पराभूत करुन 2024 वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. त्यानंतर बीसीसीआयने आता इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी संघाची घोषणा केलीय.

Cricket | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला मिळाली संधी?
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 3:48 PM

मुंबई | टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. 25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियासाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 च्या हिशोबाने महत्त्वाची आहे. तसेच इंग्लंडही या टेस्ट सीरिजसाठी जोरात तयारी करत आहे.

एका बाजूला कसोटी मालिकेची चर्चा सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यांसाठी 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने टीम इंडिया ए ची घोषणा केली आहे. टीम इंडिया ए इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 सामने खेळणार आहे. पहिला सराव सामना हा 2 दिवसांचा आहे. तर दुसरा सामना हा एकूण 4 दिवसांचा आहे.

टीम इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यातील सामन्याचं वेळापत्रक

पहिला सामना, 12-13 जानेवारी, नरेंद्र मोदी स्टेडियम ग्राउंड बी, अहमदाबाद.

दुसरा सामना, 17-20 जानेवारी, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.

टीम इंडिया ए | अभिमन्यू इश्वरन (कॅप्टन), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, प्रदोष रंजन पॉल, केएस भरत (विकेटकीपर), मानव सुथार, पुलकित नारंग, नवदीप सैनी, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) आणि आकाश दीप.

टीम इंडिया ए

अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेबाबत थोडक्यात

दरम्यान त्याआधी टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिल्यांदाच टी 20 मालिका होणार आहे. अफगाणिस्तानने टी 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. तर अजून टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित आहे. इतकंच नाही, तर रोहितला पुन्हा एकदा कर्णधारपदाची सूत्रं मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 11 जानेवारी, मोहाली.

दुसरा सामना, 14 जानेवारी, इंदूर.

तिसरा सामना , 17 जानेवारी, बंगळुरु

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.