
भारताने इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाली. तसेच शुबमन गिलच्या कसोटी नेतृत्वावर पहिल्याच पराभवाने डाग लागला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने 471 धावांची मजबूत खेळी केली होती. तसेच पहिल्या डावात इंग्लंडला 465 धावांवर रोखलं होतं. खरं तर पहिल्या डावात 6 ऐवजी मोठी आघाडी असू शकली असती. पण या डावात भारताकडून स्टार तीन झेल सुटले होते. तसेच दुसऱ्या डावातही त्याने एक झेल सोडला. त्याच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे इंग्लंडला बळ मिळालं. तसेच विकेटसाठी धडपड करणाऱ्या गोलंदाजांचा संताप झाला. दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजी यशस्वी जयस्वालने झेल सोडला तेव्हा त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. हा झेल सोडल्याने दुसऱ्या डावात इंग्लंडला मोठी भागीदारी करता आली.
बेन डकेट आणि जॅक क्राउली ही जोडी मैदानात तग धरून होती. या दोघांमध्ये 150 हून अधिक धावांची भागीदारी झाली होती. पहिल्या आणि दुसऱ्या सेशनमध्ये भारतीय गोलंदाजाना काही विकेट मिळाली नव्हती. पण या डावाच्या 39व्या षटकात मोहम्मद सिराजला एक संधी मिळाली. पण सीमेवर यशस्वी जयस्वालने सोपा झेल सोडला. सिराजच्या चेंडूवर डकेटने डीप बॅकवर्ड स्क्वेअरला शॉट मारला. यशस्वी झेलच्या खाली आला होता. डाइव्ह मारून झेल पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हातातून झेल सुटला. यामुळे सिराज खूपच निराश दिसला. बेन डकेटचा झेल सोडला तेव्हा तो 97 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने आपलं शतक पूर्ण केलं. तसेच विजयी धावांत आणखी भर घातली.
Unending Story From Yashaswi Jaisalwal ; Never Caught A Catch In Important Time . Measure Reason For Lose #INDvsENG #INDvsENGTest #YashaswiJaiswal pic.twitter.com/b36l52rDUt
— Saqlain (@SaqlainHameeed) June 24, 2025
यशस्वी जयस्वालने पहिल्या डावात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर तीन झेल सोडले होते. एका सामन्यात यशस्वीने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कारण इतके झेल आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजांनी सोडले नव्हते. यशस्वी जयस्वालच्या या कामगिरीमुळे ड्रेसिंग रुममध्ये बसलेला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही संतापला होता. दरम्यान, पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने 101 धावा केल्या होत्या. मात्र दुसर्या डावात फक्त 4 धावा करून तंबूत परतला.