AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, 1st Test : इंग्लंडचा माईंड गेम, असं फसवलं प्रसिद्ध कृष्णाला, Watch Video

भारत आणि इंग्लंड कसोटी सामन्यातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही शेपटचे फलंदाज अपयशी ठरले. त्यात प्रसिद्ध कृष्णाला उकसवून विकेट काढल्याचं दिसत आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

IND vs ENG, 1st Test : इंग्लंडचा माईंड गेम, असं फसवलं प्रसिद्ध कृष्णाला, Watch Video
IND vs ENG, 1st Test : इंग्लंडचा माईंड गेम, असं फसवलं प्रसिद्ध कृष्णाला, Watch VideoImage Credit source: video grab
| Updated on: Jun 24, 2025 | 10:01 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतली चौथ्या दिवशीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात दुसऱ्या डावात भारताचा शेवटचा विकेट प्रसिद्ध कृष्णाच्या रुपाने पडला. या विकेटसाठी इंग्लंडने माईंड गेम खेळला आणि प्रसिद्ध कृष्णाची विकेट काढली. खरं तर ही विकेट पडली नसती तर अधिक धावा झाल्या असत्या. कारण एका बाजूने रवींद्र जडेजा चांगली फलंदाजी करत होता. रवींद्र जडेजाने शोएब बशीरच्या गोलंदाजीच्या पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर शेवटच्या चेंडूचा सामना करताना प्रसिद्ध कृष्णाने उत्तुंग फटका मारला. यात जोश टंगने त्याचा झेल पकडला आणि खेळ संपला. पण या विकेट आधी इंग्लिश खेळाडूंच्या त्याच्याशी संवाद साधून ट्रॅप टाकला होता. त्यात प्रसिद्ध कृष्णा अडकला. याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध कृष्णाने रागाच्या भरात उंच फटका मारला आणि विकेट देऊन बसला. हॅरी ब्रूकने यासाठी त्याला उकसवलं होतं. स्टार स्पोर्ट्सने हा व्हिडीओ आता शेअर केला आहे. यात स्टंप माइकमध्ये हॅरी ब्रूकचा आवाज रेकॉर्ड झाला आहे.

हॅरी ब्रूकने प्रसिद्ध कृष्णाला सांगितलं की, ‘काय तू उंच षटकार मारू शकतोस का?’ यावर प्रसिद्ध कृष्णाने उत्तर दिलं की, असं झालं असतं तर मी हॅरी ब्रूक झालो असतो. या संवादानंतर पुढच्याच चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने शोएब बशीरला उंच फटका मारला. सीमेजवळ असलेल्या जोश टंगने झेल पकडताना चूक केली नाही आणि झेल पकडला. प्रसिद्ध कृष्णा बरोबर हॅरी ब्रूकच्या जाळ्यात अडकला.

भारताने दुसऱ्या डावात अवघ्या 31 धावांवर 6 विकेट गमावल्या. 364 धावांवर सर्वबाद झाले. खरं तर भारताने आरामात 400 पार धावा केल्या असत्या. पण पहिल्या डावासारख्यात दुसऱ्या डावात शेपटच्या फलंदाजांनी माती खाल्ली. त्यामुळे इंग्लंडसमोर 371 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. पाटा विकेट असल्याने या धावा गाठणं सोपं होतं. त्यामुळे इंग्लंडने चांगली सुरुवात केली. जोश टंगने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात चार चेंडूत 3 गडी बाद केले.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.