Video : जोकोविच आणि स्टीव्ह स्मिथ टेनिस कोर्टवर आमनेसामने! पहिल्या फटक्यातच नोवाकची शरणागती, मग झालं असं..

मेलबर्नचं रॉड लेव्हर टेनिस कोर्टमध्ये क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ आणि टेनिस स्टार नोवाक जोकोविच आमनेसामने आले. यावेळी उपस्थित प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं. दोघांनी एकमेकांना उत्तम साथ दिली. स्मिथने टेनिस रॅकेट, तर जोकोविचने बॅट घेत फटकेबाजी केली. यावेळी जोकोविचने उपस्थितांना हसण्यास भाग पाडलं.

Video : जोकोविच आणि स्टीव्ह स्मिथ टेनिस कोर्टवर आमनेसामने! पहिल्या फटक्यातच नोवाकची शरणागती, मग झालं असं..
Video : क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर स्मिथने टेनिस कोर्टवर आजमवला हात, पहिल्या फटक्यातच नोवाक जोकोविच झाला फॅन
| Updated on: Jan 11, 2024 | 5:47 PM

मुंबई : मेलबर्नच्या रॉड लेव्हर टेनिस कोर्टावर प्रेक्षकांना वेगळाच नजारा पाहायला मिळाला. कारण दोन वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आमनेसामने उभे टाकले होते. त्यामुळे काही काळ टेनिस कोर्टवर प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. दोन्ही खेळाडूंनी टेनिस कोर्टवर आपल्याआपल्या खेळाचा आनंद लुटला. जोकोविचने रॅकेट सोडून हाती बॅट, तर स्टीव्ह स्मिथने बॅट सोडून हाती रॅकेट घेतल्याचं पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेपूर्वी दोन्ही दिग्गजांनी क्रीडारसिकांना सुखद धक्का दिला. गुरुवारपासून या वर्षातल्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेला सुरुवात झाली. तत्पूर्वी अ नाईट विथ नोवाक अँड फ्रेंड्स या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नोवाक जोकोविचने 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. आणि पुढच्या दोन आठवड्यात आणखी एका ग्रँड स्लॅमची भर घालण्यासाठी सज्ज आहे. यावेळी कार्यक्रमाला स्टीव्ह स्मिथने हजेरी लावली. ऑस्ट्रेलियाकडून आता ओपनिंगसाठी स्टीव्ह स्थिचं नाव जाहीर झालं आहे. असं असताना हे दोन्ही दिग्गज आमनेसामने पाहण्याची संधी उपस्थित प्रेक्षकांना मिळाली.

पहिल्यांदा नोवाक जोकोविचने आपल्या टेनिस खेळातून स्टीव्ह स्मिथचा सामना केला. स्टीव्ह स्मिथ समोर असताना जोरदार सर्व्हिस केली. यावेळी स्मिथने त्याची सर्व्हिस त्याच जोमाने परतवून लावली. यामुळे जोकोविचलाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी त्याने तो शॉट पुन्हा खेळण्याऐवजी थेट हात वर करून झुकला आणि आश्चर्य व्यक्त केलं. तसेच या शॉट्सचा फॅन झाल्याचं आपल्या हावभावातून दाखवून दिलं.

त्यानंतर जोकोविचने रॅकेट बाजूला ठेवला आणि टेनिस कोर्टवर स्टंप्स आणि बॅट आणली. यावेळी गोलंदाजीनंतर जोकोविचला बॅटने चेंडू तटकावणं काही जमलं नाही. मग काय त्याने नेहमीप्रमाणे रॅकेट आणलं आणि बाजूला ठेवलं. चेंडू टाकायच्या आतच बॅट बाजूला ठेवून रॅकेट घेतलं आणि चेंडू थेट प्रेक्षकांच्या दिशेने मारला. यावेळी प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

दुसरीकडे, जोकोविचने कोर्टवर अमेरिकेचा प्रोफेशनल स्टार एलन विल्यमसोबत बास्केटबॉलही खेळला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांची मनोरंजन झालं. तसेच ऑस्ट्रेलियाच्या स्टार धावपटू पीटर बोलनेसोबतही रेसमध्ये धावला.