दीप्ती खोटं बोलते, इंग्लंडच्या महिला कर्णधाराचं ट्विट, वादाची ठिणगी

Heather Knight tweet : मांकडिंगवरुन दीप्ती शर्मानं दिलेल्या प्रतिक्रियेवर इंग्लंडकडून पलटवार करण्यात आलाय.

दीप्ती खोटं बोलते, इंग्लंडच्या महिला कर्णधाराचं ट्विट, वादाची ठिणगी
वाद काही संपेना, इंग्लंडनं पुन्हा डिवचलं
Image Credit source: social
| Updated on: Sep 26, 2022 | 8:37 PM

नवी दिल्ली :  इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ (England Women Cricket Team) आणि भारताचा महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) यांच्यात मांकडिंगवरुन (Mankading) प्रचंड वादंग सुरू आहे. एकीकडे नियमाला धरून भारताची महिला गोलंदाज दीप्ती शर्मानं (Deepti Sharma) चार्ली डिनला आऊट केलं. पण, हा पराजय काही चार्लीसह इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाला पचनी पडेना. यापूर्वी दीप्ती शर्मानं सांगितलं की, चार्लीला आधी सतर्क करण्यात आलं होतं. ती वारंवार क्रीज सोडून जातेय, हे तिला सांगण्यातही आलं होतं. पण, तिने दर्लक्ष केलं आणि इंग्लंडचा पराभव झाला. मात्र, हे पराभवाचं खापर आता इंग्लंडकडून भारतावर फोडण्याचं काम सुरु आहे.

हिदर नाइट बरळली

इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमची कर्णधार हिदर नाइट ही बरळली आहे. तिनं थेट भारताच्या महिला गोलंदाज दीप्ती शर्माला खोटं ठरवलं आहे.

हिदर नाइटचं ट्विट पाहा

नाइट तिच्या ट्विटमध्ये म्हणते की, भारतीय महिला क्रिकेट संघानं सामना जिंकला आणि ते त्यासाठी पात्र देखील होते. पण, कोणताही इशारा देण्यात आलेला नव्हता. त्यांनी इशारा देण्याची गरजही नव्हती. भारताच्या महिला संघाला खोटं बोलण्याची काहीही गरज नव्हती, असं इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हिदर नाइटनं म्हटलंय.

दीप्तीनं काय म्हटलंय?

दीप्तीनं म्हटलंय की, हा आमचा फॉर्म्यूला होता. दीप्तीनं म्हटलं की हा आमचा प्लॅन होता. दीप्तीनं मायदेशी परतल्यावर टीकाकारांना गप्पच केलंय. यावर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं देखील भाष्य केलंय.

दीप्तीनं या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हटलंय की, ‘चार्ली डीनला अनेकदा सांगूनही ती वारंवार असं करत होती. क्रिकेटचे काही नियम आहे. या गोष्टींकडे अनेकदा तिनं दुर्लक्ष केलं. पण, त्यानंतर आम्ही प्लॅन केला. हे सर्व आम्ही नियमात राहून केलं.’