आधी इशारा दिला, तरीही दुर्लक्ष केलं, दीप्तीनं टीकाकारांना गप्प केलं

सध्या क्रिकेटविश्वात एक मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. तो मुद्दा आहे मांकडिंगचा. यावर पुन्हा दीप्तीनं भाष्य केलंय.

आधी इशारा दिला, तरीही दुर्लक्ष केलं, दीप्तीनं टीकाकारांना गप्प केलं
मांकडिंगवर पुन्हा दीप्ती शर्माचं भाष्यImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 6:10 PM

नवी दिल्ली :  टीम इंडियाचा (Indian women cricket team) शनिवारी इंग्लंडविरुद्ध (England Cricket Team) तिसरा एकदिवसीय सामना होता. यात मांकडिंगनंतर (Mankading) हा सामना चांगलाच चर्चेत आलाय. यावर इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांनी आणि काही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. तर भारतीय महिला क्रिकेट संघानं हे नियमाला धरून असल्याचं स्पष्ट केलंय. यात आता दीप्ती शर्मानं पुन्हा एकदा यावर भाष्य करून भारताची चूक दाखवण्याचं नाटक करणाऱ्या टीकाकारांना चांगलंच फैलावर घेतलंय.

सामन्यात नेमकं काय घडलं?

इंग्लंड विरुद्धच्या वनडेमध्ये चार्ली डीन तेव्हा 47 धावांवर खेळत होती. इंग्लंडला विजयासाठी 17 धावांची गरज होती. याचवेळी गोलंदाजीसाठी आलेल्या दीप्तीनं नॉन स्ट्राईकवर उभी असलेली चार्ली क्रीजच्या बाहेर गेल्यानं प्रसंगावधान राखत बॉल स्टंपला लावला आणि तिला आऊट केलं.

हे मांकडिंग रनआऊट होतं. यावेळी टीम इंडिया जिंकली. पण, यानंतर प्रचंड टीका होऊ लागली. हे सर्व भावनाला धरून नसल्याचंही इंग्लंडच्या काही क्रिकेटर्सनं म्हटलंय. यावर आता दीप्तीनं भाष्य केलंय.

हा आमच्या फॉर्म्यूला होता

दीप्तीनं म्हटलंय की, हा आमच्या फॉर्म्यूला होता. दीप्तीनं म्हटलं की हा आमचा प्लॅन होता. दीप्तीनं मायदेशी परतल्यावर टीकाकारांना शांत केलंय. यावर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं देखील भाष्य केलंय.

दीप्तीनं या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हटलंय की, चार्ली डीनला अनेकदा सांगूनही ती वारंवार असं करत होती. क्रिकेटचे काही नियम आहे. या गोष्टींकडे अनेकदा तिनं दुर्लक्ष केलं. पण, त्यानंतर आम्ही प्लॅन केला. हे सर्व आम्ही नियमात राहून केलं.

एमसीसीनं नियम सांगितला

क्रिकेट नियम बनवणारी संस्था असलेल्या एमसीसीनं देखील यावर भाष्य केलंय. नॉन स्ट्राइकरवर उभी असलेली फलंदाज तोपर्यंत धावू शकत नाही. जोपर्यंत गोलंदाजाच्या हातात चेंडू असेल, असं एमसीसीनं म्हटलं आहे.

एमसीसीकडूनही रनआऊट योग्य

इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये जे काही घडलं. ते नियमाला धरून आहे. यापेक्षा यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असंही एमसीसी या क्रिकेट नियम बनवणाऱ्या संस्थेनं म्हटलंय.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.