IPL 2023 दरम्यान टीम इंडियाचे खेळाडू खास GPS डिवाइस घालूनच मैदानात उतरतील, कारण….

| Updated on: Mar 30, 2023 | 1:49 PM

IPL 2023 News : इंडियन प्रीमिअर लीग 2023 दरम्यान टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूच्या वर्कलोडवर नजर ठेवली जाईल. टुर्नामेंट दरम्यान सर्वच खेळाडूंना एक खास जीपीएस डिवाइस घालाव लागेल.

IPL 2023 दरम्यान टीम इंडियाचे खेळाडू खास GPS डिवाइस घालूनच मैदानात उतरतील, कारण....
Team india
Image Credit source: AFP
Follow us on

IPL 2023 News : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या IPL लीगची सुरुवात 31 मार्चपासून होणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतातील टॉप क्रिकेटर्सही आपल्या टीमला जिंकवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. टीम इंडियाच्या खेळाडूंवर बीसीसीआयची खास नजर असेल. आयपीएल दरम्यान भारतीय खेळाडूंना दुखापती होऊ नयेत, यासाठी बीसीसीआयने खास व्यवस्था केली आहे.

आयपीएल नंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड कप सुद्धा आहे. बीसीसीआयला आपल्या खेळाडूंना दुखापतींपासून वाचवायच आहे.

मॅच दरम्यानही हे जीपीएस डिवाइस

बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना दुखापतीपासून वाचवण्यासाठी वर्कलोड मॅनेजमेंटचा निर्णय घेतला आहे. आय़पीएल दरम्यान सर्वच खेळाडूंच वर्कलोड मॅनेज केलं जाईल. रिपोर्ट्सनुसार, भारतीय टीमचे बहुतांश खेळाडू जीपीएस डिवाइस घालून मैदानात उतरतील. प्रॅक्टिसच नाही, मॅच दरम्यानही हे जीपीएस डिवाइस खेळाडूंकडे असेल. यामुळे काय होणार? ते जाणून घ्या.

या डिवाइसमुळे काय होणार?

फिटनेसवर नजर रहावी, यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंना हे जीपीएस डिवाइस घालाव लागेल. या डिवाइसच्या माध्यमातून खेळाडूंची एनर्जी लेव्हल, हार्टबीट, ब्लड प्रेशर समजणार आहे. एकूणच या डिवाइसमुळे खेळाडूंना कधी आरामाची गरज आहे? कधी ते पूर्णपणे फिट आहेत? ते समजेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची टीम या डिवाइसचा वापर करते. भारतात हॉकी टीमचे खेळाडू या डिवाइसचा वापर करतात. अलीकडे WPL दरम्यान भारतीय खेळाडूंनी हे डिवाइस घातलं होतं. तिथे यश मिळाल्यानंतरच आयपीएलमध्ये याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनेक खेळाडूंना दुखापती

बीसीसीआयला आपल्या खेळाडूंना दुखापतीपासून वाचवायच आहे. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाहीत. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच मोठं नुकसान झालय. तो आशिया कप त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप मध्ये खेळू शकला नाही. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणं मुश्किल दिसतय. या डिवाइसमुळे टीम इंडियाचा किती फायदा होतो? ते लवकरच समजेल.