AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DY Patil T20 Cup 2026: वैभव सूर्यवंशी -अर्जुन तेंडुलकरची विजयी खेळी, दोघांनी 48 चेंडूत ठोकल्या 118 धावा

Arjun Tendulkar-Vaibhav Sooryavanshi: डीवाय पाटील टी20 कप 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर या दोघांनी वादळी खेळी केली. पहिल्यांदाच हे दोघं एकत्र खेळले. दोघांनी 200पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या.

DY Patil T20 Cup 2026: वैभव सूर्यवंशी -अर्जुन तेंडुलकरची विजयी खेळी, दोघांनी 48 चेंडूत ठोकल्या 118 धावा
DY Patil T20 Cup 2026: वैभव सूर्यवंशी -अर्जुन तेंडुलकरची विजयी खेळी, दोघांनी 48 चेंडूत ठोकल्या 118 धावाImage Credit source: PTI
| Updated on: Feb 26, 2026 | 7:27 PM
Share

डीवाय पाटील टी20 कप 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकरच्या फलंदाजीचं वादळ घोंघावलं. पहिल्यांदाच हे दोघं एकत्र एका संघात खेळले. या दोघांच्या झंझावाती खेळीमुळे संघाला विजयाची चव चाखता आली. वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर या स्पर्धेत डीवाय पाटील ब्लू संघाकडून खेळत आहेत. अर्जुन तेंडुलकर डीवाय पाटील टी20 कप स्पर्धेत खेळला आहे. पण वैभव सूर्यवंशीचा डीवाय पाटील टी20 कप स्पर्धेचं पहिलं पर्व आहे. वैभव आणि अर्जुनने 25 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात इंडियन नेवी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. वैभव सूर्यवंशीने ओपनिंगला उतरत आक्रमक सुरूवात करून दिली. तर अर्जुन तेंडुलकरने सामना संपवला. या दोघांनी मिळून 48 चेंडूत 118 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

इंडियन नेवी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 219 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 220 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाक करण्यासाठी डीवाय पाटील ब्लू संघाकडून वैभव सूर्यवंशी आणि यश ढुल ही जोडी मैदानात उतरली होती. या सामन्यात यश ढुलची विकेट झटपट मिळाली . पण वैभव सूर्यवंशी वादळ घोंघावलं. त्याने 19 चेंडूत 63 धावा केल्या. यात त्याने 5 षटकार आणि 7 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 331.58 चा होता. त्याच्या या खेळीमुळे संघाच्या विजयाचा पाया रचला गेला. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरने विजयाचा कळस चढवला.

अर्जुन तेंडुलकरने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 29 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 189.66 चा होता. यावेळी त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अर्जुन तेंडुलकरने षटकार मारला आणि विजयाची नोंद केली. वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदाच एकत्र खेळले. या सामन्यात दोघांनी आपली आक्रमकता दाखवली. या दोघांनी डीवाय पाटील ब्लूसाठी 48 चेंडूत 118 धावा केल्या. यात 7 षटकार आणि 14 चौकार मारले. आयपीएल स्पर्धेत दोघंही वेगवेगळ्या फ्रेंचायझीकडून मैदानात उतरणार आहेत. वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स, तर अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...