सचिन तेंडुलकरबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, जाणून घ्या काय घेतला निर्णय ?

सचिन तेंडुलकर हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. क्रिकेटचा देव म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या सचिन तेंडुलकरबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सचिन तेंडुलकरबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, जाणून घ्या काय घेतला निर्णय ?
| Updated on: Aug 22, 2023 | 4:06 PM

मुंबई : सचिन तेंडुलकर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. 100 शतकांचा बादशाह आणि सर्वाधिक रन करणारा क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. भारताच्या निवडणूक आयोगानेही त्याच्या या कारकीर्दीची दखल घेतली आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरला स्वतःशी जोडले आहे.

सचिन तेंडुलकर राष्ट्रीय आयकॉन

भारताच्या निवडणूक आयोगाने सचिनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक क्रिकेटमधील मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला आपला राष्ट्रीय आयकॉन बनवले आहे. सचिन तेंडुलकरची जी प्रतिमा आहे, या भूमिकेसाठी त्याच्यापेक्षा चांगला पर्याय क्वचितच असू शकतो.

स्वच्छ प्रतिमा असलेला खेळाडू

भारतरत्न सचिन तेंडुलकर आता देशभरातील निवडणूक आयोगाचा चेहरा असणार आहे. 24 वर्षे क्रिकेटमध्ये राहून देखील त्याने त्याची प्रतिमेला कधीही धक्का लागू दिलेला नाही. सचिन तेंडुलकर फक्त भारतातच नाही तर जगभरातील खेळाडूंमध्ये स्वच्छ प्रतिमा असलेला खेळाडू आहे. निवृत्ती घेतल्यानंतरही त्याने कधीची आपले वर्तन बदलले नाही.

सचिन तेंडुलकरचे लाखो फॉलोअर्स

सचिन तेंडुलकर हा सोशल मीडियावर देखील आता बराच सक्रिय असतो. त्याचे फॉलोअर्स यामाध्यमातून त्याच्याबाबत अपडेट घेत असतात. आता भारताच्या निवडणूक आयोगाने देखील सचिनला राष्ट्रीय आयकॉन बनवण्याचा निर्णय घेतला आहे.