ENG vs IND : चौथ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, त्या तिघांना संधी नाहीच

England vs India 4th Test Playing 11 : मँचेस्टरमधील ओल्ट ट्रॅफर्ड मैदानात होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी यजमान इंग्लंड क्रिकेट संघाने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली.

ENG vs IND : चौथ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, त्या तिघांना संधी नाहीच
England vs India National Anthem
Image Credit source: Bcci
| Updated on: Jul 21, 2025 | 9:56 PM

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आता अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. उभयसंघातील हा सामना 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतासमोर मालिकेत कायम राहण्यासाठी मँचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यात विजयी होण्याचं आव्हान आहे. तर इंग्लंड हा सामना जिंकून मालिका नावावर करण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडने त्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. इंग्लंडने चौथ्या सामन्यासाठी सोमवारी 21 जुलैला प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

बेन स्टोक्स हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. दुखापतीमुळे इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बशीर याला मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे त्याच्या जागी लियाम डॉसन याचा इंग्लंड संघात समावेश केला गेला. त्यानंतर आता लियाम डॉसन याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

इंग्लंडने 15 जुलैला चौथ्या सामन्यासाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला. लियामचा या संघात समावेश करण्यात आला. तेव्हापासूनच लियामची निवड होणार असल्याचं निश्चित समजलं जात होतं. तर आता त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाला आहे. तर गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल आणि जोश टंग या तिघांना तिसऱ्यानतंर चौथ्या सामन्यातही प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

नितीश-अर्शदीप आऊट, बुमराह खेळणार!

इंग्लंडने एका बाजूला प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करत चौथ्या सामन्यासाठी तयारी सुरु केली आहे. तर टीम इंडियाला 2 झटके लागले आहेत. ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. तर एकही सामना न खेळलेला अर्शदीप सिंह याला दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे मालिकेत नितीशच्या जागी अंशुल कंबोज याचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच जसप्रीत बुमराह चौथ्या सामन्यात असल्याची माहिती भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने पत्रकार परिषदेत दिली.

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप , जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, लियाम डॉसन, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर.