IND vs ENG : इंग्लंड-इंडिया पहिल्या टेस्टमधून 2 खेळाडू आऊट, टीमला मोठा झटका

England vs India Test Series 2025 : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सलामीचा सामना हा हेडिंग्ले लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे.

IND vs ENG : इंग्लंड-इंडिया पहिल्या टेस्टमधून 2 खेळाडू आऊट, टीमला मोठा झटका
Test Cricket
Image Credit source: Mike Hewitt/Getty Images
| Updated on: Jun 05, 2025 | 11:37 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार संपला आहे. आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला. लीग क्रिकेटनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहायला मिळणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ अवघ्या काही दिवसांनी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेचं आयोजन 20 जून 4 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीतील पहिली मालिका असणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची 24 मे रोजी घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याला कर्णधारपद देण्यात आलं. तर ऋषभ पंत याला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 5 जून रोजी पहिल्या कसोटीसाठी थेट प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं. इंग्लंडच्या 2 खेळाडूंना पहिल्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. स्पिनर गस एटकीन्सन आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर या दोघांना दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात संधी मिळालेली नाही.

कुणाला काय झालंय?

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा पूर्णपणे फिट नाही. तर एटकीन्सन याला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. एटकीन्सन पहिल्या सामन्यापर्यंत फिट होईल, अशी आशा इंग्लंड क्रिकेट बोर्डाला होती. मात्र तोपर्यंत एटकीन्सन फिट होणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जेमी ओव्हरटन याला संधी देण्यात आली आहे.

टीम इंडियाला दिलासा

दरम्यान एटकीन्सन आणि आर्चर हे दोघे नसणं टीम इंडियासाठी मोठा दिलासा आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विन या तिघांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. टीम इंडियातील अनेक खेळाडूंचा हा पहिलाच इंग्लंड दौरा आहे. त्यामुळे या खेळाडूंसमोर अनेक आव्हानं आहेत. अशात जोफ्रा आणि एटकीन्सन नसल्याने टीम इंडियाला काही प्रमाणात दिलासा आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

पहिल्या टेस्ट मॅचसाठी इंग्लंडचे 11 शिलेदार : बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जॉश टंग, ख्रिस वोक्स.

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दूल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव.