ENG vs SL : दोन्ही हाताने बॉलिंग करणाऱ्याचा बॅटिंगने धमाका, इंग्लंड विरुद्ध शतकी खेळी

Kamindu Mendis Century: श्रीलंकेच्या कामिंदू मेंडीस याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी शतकी खेळी केली.

ENG vs SL : दोन्ही हाताने बॉलिंग करणाऱ्याचा बॅटिंगने धमाका, इंग्लंड विरुद्ध शतकी खेळी
kamindu mendis century
Image Credit source: AFP
| Updated on: Aug 25, 2024 | 12:51 AM

श्रीलंकेचा युवा फलंदाज कामिंदु मेंडीस याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी शतकी खेळी केली आहे. कामिंदूने 167 बॉलच्या मदतीने हे शतक झळकावलं. कामिंदूच्या चौथ्या कसोटी सामन्यातील हे तिसरं शतक ठरलं. कामिंदुने सातव्या स्थानी येत हे शतक ठोकलं. कामिंदू सामन्यातील पहिल्या डावातही बॅटिंगसाठी सातव्या स्थानी आला. मात्र त्याला पहिल्या डावात फार काही करता आलं नाही.कामिंदू पहिल्या डावात 12 धावा करुन बाद झाला. मात्र कामिंदूने दुसऱ्या डावात शतक ठोकलं.

कामिंदू कसोटी क्रिकेटमध्ये सातव्या स्थानी येत इंग्लंडमध्ये शतक करणारा श्रीलंकेचा पहिला फलंदाज ठरला आहे. कामिंदू मैदानात आला तेव्हा इंग्लंडची 4 बाद 95 अशी स्थिती होती. कामिंदूने अशा अडचणीच्या स्थितीत बॅटिंगसाठी येत निर्णायक खेळी केली आणि श्रीलंकेसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. कामिंदूला या शतकी खेळीचं द्विशतक करण्याची संधी होती. मात्र कामिंदूला शतकानंतर 13 धावाच करु शकला. कामिंदूने 183 बॉलमध्ये 15 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 61.75 च्या स्ट्राईक रेटने 113 धावा केल्या.

4 दशकांआधीचा रेकॉर्ड ब्रेक

कामिंदूने या शतकी खेळीसह 40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला. कामिंदू सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या स्थानी येऊन इंग्लंडमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कामिंदूआधी हा विक्रम दलीप मेंडीस यांच्या नावावर होता. दलीप मेंडीस यांनी 1984 मध्ये लॉर्ड्समध्ये 94 धावांची खेळी केली होती.

दोन्ही हाताने बॉलिंग

कामिंदूने 2018 साली टी 20i आणि 2019 मध्ये एकदिवसीय पदार्पण केलं. कामिंदूने तेव्हा दोन्ही हाताने बॉलिंग करत सर्व क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. कामिंदू तेव्हापासून दोन्ही हाताने बॉलिंग करणारा गोलंदाज म्हणून जाऊ लागला.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो आणि मिलन रथनायके.

Follow Us