
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी चिवट झुंज पाहायला मिळाली. खरं पाहायला गेलं तर या सामन्यावर इंग्लंडने मजबूत पकड मिळवली आहे. पण श्रीलंकेने तितकंच तोडीस तोड उत्तर दिलं आहे. सामना हातू असाच सोडणार नाही हे दाखवून दिलं आहे. पहिल्या डावात अनुभवी अँजेलो मॅथ्यूज फेल ठरला होता. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. वेल लेफ्टच्या नादात पायचीत झाला होता. तसेच रिव्ह्यूही वाया घालवला. त्यामुळे 109 कसोटी सामने खेळलेल्या मॅथ्यूजवर टीका झाली होती. त्याचं उत्तर मॅथ्यूजने दुसऱ्या डावात दिलं. इंग्लंडचा पहिला डाव 358 धावांवर आटोपला आणि 122 धावांची आघाडी मिळाली. ही आघाडी मोडून काढताना श्रीलंकेची फलंदाजी घसरली. पहिल्या दोन षटकात दोन गडी गमवण्याची वेळ आली. निशान मदुशंका आणि कुसल मेंडिस यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे सर्व जबाबदारी मधल्या फळीतील अँजेलो मॅथ्यूजवर आली.
तिसऱ्या विकेटसाठी दिमुथ करुणारत्नेसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पण दिमुथ 27 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर दिनेश चंडिमलला दुखापत झाल्याने 10 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागेवर आलेला धनंजय डिसिल्वा काही खास करू शकला नाही आणि 11 धावा करून बाद झाली. त्यामुळे इंग्लंडची 122 धावांची आघाडी मोडून काढताना दमछाक झाली. असं असताना अँजेलो मॅथ्यूजने चिवट खेळी केली. पहिल्या डावातील चूक दुरुस्त करून इंग्लंडला वेठीस आणलं. अर्धशतकी खेळी करून इंग्लंडची आघाडी मोडून काढली. आता विजयासाठी जास्तीत जास्त धावा देण्याचा प्रयत्न असणार आहे.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड, शोएब बशीर.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन) : दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो, मिलन प्रियनाथ रथनायके