ENG vs SL 2nd Test: श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ स्थिती, इंग्लंड विरुद्ध जिंकणार का?

England vs Sri Lanka 2nd Test Series: श्रीलंका क्रिकेट टीम इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. श्रीलंकेला मालिकेत कायम राखण्यसाठी दुसऱ्या सामन्यात कमबॅक करावं लागणार आहे.

ENG vs SL 2nd Test: श्रीलंकेसाठी करो या मरो स्थिती, इंग्लंड विरुद्ध जिंकणार का?
sri lanka cricket team
Image Credit source: AFP
| Updated on: Aug 29, 2024 | 3:53 PM

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात 29 ऑगस्टपासून कसोटी सामन्यातील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे. या दुसर्‍या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ओली पोप इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर धनंजया डी सिल्वा श्रीलंकेचं कर्णधारपद सांभाळणार आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे इंग्लंड या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे श्रीलंकेचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच श्रीलंकेला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांनी सामन्याआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडने 27 ऑगस्ट रोजी संघ जाहीर केला. इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला. मार्क वूड याच्या जागी ओली स्टोन याचा समावेश केला आहे. तर श्रीलंकेने 28 ऑगस्टला प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली. श्रीलंकेने 2 बदल केले आहेत. कुसल मेंडीस आणि विश्वा फर्नांडो या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू मिळाला आहे. कुसलऐवजी पाथुम निसांकाला संधी मिळाली आहे. तर विश्वा फर्नांडो याच्या जागी लहिरु कुमाराला संधी मिळाली आहे.

इंग्लंड-श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज

दुसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर

इंग्लंड विरूद्धच्या दुसर्‍या कसोटीसाठी श्रीलंकेची प्लेइंग ईलेव्हन: धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल,कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रत्नाययके.