
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात सध्या टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंड या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे काउंटी ग्राउंड, ब्रिस्टोल, येथे करण्यात आलं आहे. हॅरी ब्रूक याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. शाई होप विंडीजचं नेतृत्व करत आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हॅरी ब्रूक याने फिल्डींगचा निर्णय घेत विंडीजला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
इंग्लंडने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. हॅरी ब्रूकने ल्यूक वूड याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली आहे. ल्यूकचा मॅथ्यू पॉट्सच्या जागी समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिजला मोठा झटका लागला आहे. आंद्रे रसेल याला बाहेर व्हावं लागलं आहे. रसेलच्या जागी अकिल होसेन याचं कमबॅक झालंय.
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात 6 जूनला या 3 सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना खेळवण्यात आला. इंग्लंडने हा सामना जिंकून विजयी सलामी दिली आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे इंग्लंडकडे दुसरा सामन्यासह मालिका विजयाची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडीजसाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे विंडीज या सामन्यात विजय मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावणार, हे निश्चित आहे. त्यामुळे इंग्लंड दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकणार की विंडीज बरोबरी साधण्यात यश मिळवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इंग्लंड टॉसचा बॉस, विंडीजची बॅटिंग
The #MenInMaroon will take first strike after England won the toss and elected to bowl. #ENGvWI | #MenInMaroon pic.twitter.com/7hr8Q04HMe
— Windies Cricket (@windiescricket) June 8, 2025
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन : एविन लुईस, जॉन्सन चार्ल्स, शाई होप (कर्णधार), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोवमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकिल होसेन, गुडाकेश मोती आणि अल्झारी जोसेफ.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जेमी स्मिथ, बेन डकेट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कॅर्टन), टॉम बँटन, जेकब बेथेल, विल जॅक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद आणि ल्यूक वूड.