ENG vs WI 2nd T20i : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने, कोण जिंकणार दुसरा सामना?

England vs West Indies 2nd T20I Live Streaming : रविवारी 8 जून रोजी इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी दुसऱ्या टी 20i सामन्याचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघात हा सामना जिंकण्यासाठी जोरदार रस्सीखेच असणार आहे.

ENG vs WI 2nd T20i : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने, कोण जिंकणार दुसरा सामना?
ENG vs WI T20i Series
Image Credit source: windies cricket x account
| Updated on: Jun 08, 2025 | 12:25 AM

वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आयपीएलनंतर सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजला या दौऱ्यात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. इंग्लंडने हॅरी ब्रुक याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजचा क्लिन स्वीपने धुव्वा उडवला. इंग्लंडने विजयी हॅटट्रिक करत एकदिवसीय मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर उभयसंघातील 3 सामन्यांच्या मालिकेला 6 जूनपासून सुरुवात झाली. विंडीज या मालिकेतही विजयाने सुरुवात करण्यात अपयशी ठरली. इंग्लंडने विंडीजवर मात करत टी 20i मालिकेतही विजयी घोडदौड कायम राखली. आता उभयसंघातील दुसरा सामना कोण जिंकणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकिदवसीय सामना हा रविवारी 8 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. हॅरी ब्रूक हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर शाई होप याच्याकडे विंडीजच्या कर्णधारपदाची धुरा आहे. या दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? सामना कुठे पाहता येणार? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसरा टी 20i सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसरा टी 20i सामना रविवारी 8 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसरा टी 20i सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसरा टी 20i सामना काउंटी ग्राउंड, ब्रिस्टोल येथे होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसऱ्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड विरुद्ध विंडीज दुसरा टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

इंग्लंड टीम: जेमी स्मिथ, बेन डकेट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रुक (कर्णधार), टॉम बँटन, जेकब बेथेल, विल जॅक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, मॅथ्यू पॉट्स, रेहान अहमद, साकिब महमूद आणि ल्यूक वूड.

वेस्ट इंडिज टीम: एविन लुईस, जॉन्सन चार्ल्स, शाई होप (कर्णधार आणि विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, आंद्रे रसेल, रोमारियो शेफर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, अकिल होसेन, शिमरॉन हेटमायर, ब्रँडन किंग आणि मॅथ्यू फोर्ड.