
आयपीएलच्या 18 व्या मोसमानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. कर्णधार म्हणून शुबमन गिल याची ही पहिलीच मालिका असणार आहे. तसेच निवड समितीने अनेक खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पहिल्या सामन्यासाठी 15 दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडचा अनुभवी ऑलराउंडर बेन स्टोक्स इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर अनुभवी जो रुट, ओली पोप, बेन डकेट यासह इतर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
इंग्लंड टीममध्ये वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटन याचं कमबॅक झालं आहे. तर गस एटकीन्सन याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. तसेच झॅक क्रॉली, हॅरी ब्रूक, सॅम कूक आणि जेकब बेथल हे खेळाडू इंग्लंडच्या टीममध्ये आहेत. फिरकी गोलंदाजाची जबाबदारी शोएब बशीर याच्यावर असणार आहे. तर जेमी ओव्हरटन, जोश टंग, ख्रिस वोक्स आणि ब्रायडन कार्स यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. जॉनी स्मिथ याचा विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे.
जेमी ओव्हरनसाठी ही मोठी संधी आहे. कारण त्याला 3 वर्षांनंतर कसोटी संघात कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे जेमी टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करतो? याकडे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं आणि निवड समितीचं लक्ष असणार आहे.
इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन आली रे
A simply HUGE series awaits 🙌
Our squad for the 1st Test is HERE 👇
🏴 #ENGvIND 🇮🇳
— England Cricket (@englandcricket) June 5, 2025
टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन), शोएब बशीर, जॅकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग आणि क्रिस वोक्स.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव.