
पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, टीम इंडियानंतर आता इंग्लंडने आगामी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. हीथर नाईट हीच्या नेतृत्वात इंग्लंडच्या महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहेत. तसेच विकेटकीपर बॅट्समन बेस हीथ आणि ऑलराउंडर फ्रेया केम्प या दोघींना पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात आली आहे. तसेच डेनियल गिब्सन हीचाही समावेश करण्यात आला आहे. गिब्सन हीचा गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता. तसेच सोफी एक्लेस्टोन आणि लिन्सी स्मिथ या दोघींवर फिरकी गोलंदाजाची जबाबदारी असणार आहे. सोफीने 2023 च्या वूमन्स वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे यूएईत करण्यात आलं आहे. एकूण 10 संघाना 5-5 नुसार 2 गटात विभागलं गेलं आहे. त्यानुसार इंग्लंड बी ग्रुपमध्ये आहे. इंग्लंडसह या बी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलँडचा समावेश करण्यात आलेला आहे.
इंग्लंड क्रिकेट टीम वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून करणार आहे. इंग्लंडसमोर सलामीच्या सामन्यात बांगलादेशचं आव्हान असणार आहे. त्यानंतर दुसरा सामना हा 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडणार आहे. इंग्लंड तिसऱ्या सामन्यात 13 ऑक्टोबरला स्कॉटलँड विरुद्ध भिडेल. तर साखळी फेरीतील चौथा आणि अखेरचा सामना हा वेस्ट इंडिज विरुद्ध खेळवण्यात येईल. तर 17-18 ऑक्टोबरला उपांत्य फेरीतील सामने होतील. तसेच 20 ऑक्टोबरला महाअंतिम सामना खेळवण्यात येईल.
टी 20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय संघ जाहीर
LET’S. GO. 🔥
England Women’s T20 World Cup Squad, ready to entertain and inspire 🤩#EnglandCricket pic.twitter.com/IvIF1OyvV8
— England Cricket (@englandcricket) August 27, 2024
विरुद्ध बांगलादेश, 5 ऑक्टोबर, शारजाह
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 7 ऑक्टोबर, शारजाह
विरुद्ध स्कॉटलँड, 13 ऑक्टोबर, शारजाह
विरुद्ध विंडिज, 15 ऑक्टोबर, दुबई
वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी इंग्लंड टीम: हीथर नाइट (कॅप्टन), लॉरेन बेल, माया बाउचियर, ऐलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, डेनिएल गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ (विकेटकीपर), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, नॅट साइवर-ब्रंट, लिन्सी स्मिथ आणि डॅनी व्याट.