IPL मधून कोट्यावधी कमावून भारतीयांचीच थट्टा, इंग्लंडच्या बटलर-मॉर्गनने रंग दाखवला

| Updated on: Jun 09, 2021 | 3:05 PM

इंग्लंडच्या ऑली रॉबिनसनला 2012-13 च्या सुमारास खळबळजनक ट्वीट्समुळे निलंबित केले होते. त्यानंतर आता जॉस बटलर आणि इयॉन मॉर्गन यांचीही कसून चौकशी होत आहे.

IPL मधून कोट्यावधी कमावून भारतीयांचीच थट्टा, इंग्लंडच्या बटलर-मॉर्गनने रंग दाखवला
morgen butler
Follow us on

लंडन : जगात देशांर्गत खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धांमधील एक सर्वात मोठी स्पर्धा म्हणून इंडियन प्रिमीयर लीग (IPL) प्रसिद्ध आहे. अनेक विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळून रग्गड पैसे कमावतात. यातच इंग्लंडच्या जॉस बटलर (Jos Butler) आणि इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) यांचही नाव येतं. पण हे दोघेही भारतात पैसे कमवून भारतीयांचीच थट्टा करत असल्याचं त्याच्या ट्विट्सवरुन समोर आलं आहे. भारतीयांच्या इंग्रजी बोलण्यावरुन वर्णभेदी टीका हे दोघेही करत असून त्याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड (England & Wales Cricket Board)
दोघांचीही चौकशी करत आहेत.

इसीबीने योग्य आणि त्वरीत कारवाई करणार असल्याचं सांगितल आहे. या व्हायरल झालेल्या ट्विट्समध्ये बटवर आणि मॉर्गन ‘सर’ या शब्दाचा सतत वापर करुन भारतीयांच्या प्रत्येकाला आदराने सर बोलण्याच्या सवयीची थट्टा उडवत आहेत. याआधी ऑली रॉबिनसन या इंग्लंडच्या खेळाडूला 2012-13 च्या सुमारास अशाच एका खळबळजनक ट्विटसाठी निलंबित करण्यात आले होते.

इयॉन मॉर्गनचे ट्विट

जोस बटलरचे ट्विट

नेमकं काय आहे ट्विटमध्ये

टेलीग्राफ या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, मॉर्गनने बटलरला टॅग करत एक ट्विट केलं ज्यात लिहिलं. ‘सर तुम्ही माझे आवडते फलंदाज आहात.’ हे ट्विट न्यूझीलंड फलंदाज ब्रँडन मॅक्क्युलमच्या एका ट्विटला केलेला रिप्लाय होता. हे ट्विट 2018 च्या सुमारासचे असून सध्या त्यांची तपासणी सुरु असल्याच रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

इसीबी योग्य कारवाई करणार

या सर्व प्रकाराची इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तपासणी सुरु केली आह. याबाबत बोलताना इसीबीचा एक प्रवक्त्या म्हणाला, ”आम्हाला मागील आठवड्यात या ट्विट्सबाबत माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही या सर्वाची नीट चौकशी करत असून इतर खेळाडूंचे अकाऊंटही तपासत आहोत. आमच्या इथे असा भेदभाव अजिबात सहन केला जाणार नाही. आम्ही दोषींविरुद्ध योग्य कारवाई करु.”

हे ही वाचा –

क्रिकेटच्या मैदानातील सर्वात मोठा इतिहास न्यूझीलंडच्या नावावर, वन डे मध्ये 491 धावा, 347 धावांचा ‘भयंकर’ विजय

WTC फायनल सामन्यात सर्वाधिक रन्स कोण करणार? अजित आगरकरने सांगितलं नाव!

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

(England Cricketer Jos Butler Eoin Morgan Anti India Tweet Viral both are under Investigation By ECB)