Lords Test : ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंडच्या खेळाडूची कमाल, सलामीच्या सामन्यात पटकावल्या आठ विकेट्स

| Updated on: Aug 13, 2021 | 7:14 PM

आपल्या सलामीच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी करणं प्रत्येक खेळाडूच स्वप्न असतं. अशीच कामगिरी इंग्लंडच्या एका गोलंदाजाने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर केली होती.

Lords Test : ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंडच्या खेळाडूची कमाल, सलामीच्या सामन्यात पटकावल्या आठ विकेट्स
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

लंडन : क्रिकेटची पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर केलेल्या कोणत्याही कामगिरीची इतिहासात नोंद केली जाते. मग ते फलंदाजाच शतक असो किंवा गोलंदाजाची पाच विकेट्स घेण्याची कमाल! साऱ्याचीच नोंद इतिहासांत असते. अशीच एक ऐतिहासिक कामगिरी इंग्लंड क्रिकेट संघाच्या (England Cricket Team) निक कुक (Nick Cook) या खेळाडूने केली होती. ती म्हणजे एकाच सामन्यात त्याने आठ विकेट्स घेतल्या होत्या. विशेष गोष्ट म्हणजे हा त्याचा सलामीचा सामना होता. संघातील एक खेळाडू दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेल्याने संधी मिळालेल्या कुकने ही कामगिरी आजच्याच दिवशी म्हणजे 13 ऑगस्ट रोजी केली होती.

गोष्ट आहे 1983 सालची. इंग्‍लंड आणि न्‍यूझीलंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानात 11 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान एक कसोटी सामना खेळवण्यात आला होता. इंग्‍लंड गोलंदाज एडमंड दुखापतीमुळे मैदानात उतरु शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी निक कुक या गोलंदाजाने डेब्यू करत पहिला सामना खेळला. इंग्‍लंडने पहिल्यांदा फलंदाजी करत 326 धावा बनवल्या. ज्यात डेविड गावरने 108 आणि माइक गॅटिंगने 81 रन्स केले. न्‍यूझीलंडकडून रिचर्ड हेडलीने पाच विकेट्स घेतल्या. न्‍यूझीलंडचा पहिला डाल मात्र अवघ्या 191 धावांवर आटोपला. न्यूझीलंडला इतक्या कमी धावांत सर्वबाद करण्यात मोठा वाटा उचलला सलामीचा सामना खेळणाऱ्या निक कुकने. त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या.

दुसऱ्या डावातही निकची कमाल

त्यानंतर इंग्‍लंडचा दुसरा डाव 211 धावांवर आटोपला. इयान बॉथमने सर्वाधिक 61 धावा केल्या. तर क्रिस स्मिथने 43 धावा केल्या. ज्यानंतर न्‍यूझीलंडला विजयासाठी 347 धावांच लक्ष्य होतं. जे मिळवताना त्यांचा संपूर्ण संघ 219 धावांवर सर्वबाद झाला आणि इंग्लंडने 127 धावांनी विजय मिळवला. या डावातही  निक कुकने अप्रतिम कामगिरी करत तीन महत्त्वाचे विकेट्स घेतले. ज्यामुळे त्याने सलामीच्या सामन्यात आठ विकेट्स पूर्ण करत संघाला विजयही मिळवून दिला. निक कुकने त्याच्या कारकिर्दीत 15 टेस्‍टमध्ये 52 विकेट घेतले. तर 3 वनडे सामन्यांत 5 विकेट्स घेतले होते.

हे ही वाचा

आधी दमदार फलंदाजी, मग भेदक गोलंदाजी, इंग्लंडमध्ये ‘या’ खेळाडूने 5 चेंडूत घेतले 4 विकेट

इंग्लंडमध्ये एकाच वेळी घेतला तीन दिग्गजांनी संन्यास, भेदक गोलंदाज, धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षकाचा समावेश 

(England cricketer nick cook took eight wickets on his debut match at lords on this day agaisnt new zealand)