अवघ्या 29व्या वर्षी 33 सामने खेळलेल्या खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, झालं असं की…

वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धा तोंडावर असताना 29 वर्षीय महिला क्रिकेटपटूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज असलेल्या फ्रेया डेव्हिसने इंग्लंडसाठी 33 सामने खेळले आहेत. पण अचानक निवृत्ती घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अवघ्या 29व्या वर्षी 33 सामने खेळलेल्या खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, झालं असं की...
अवघ्या 29व्या वर्षी 33 सामने खेळलेल्या खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, झालं असं की...
Image Credit source: ECB/ECB via Getty Images
| Updated on: Sep 22, 2025 | 8:25 PM

महिला क्रिकेट विश्वात 29 वर्षीय क्रिकेटपटू फ्रेया डेविस हीने निवृत्ती जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इंग्लंड संघात वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावणाऱ्या फ्रेया डेविसने अचानक निवृत्ती घेतली. वयाच्या 29व्या वर्षी तिने इतका मोठा निर्णय घेतल्याने चर्चा तर होणार.. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्वीट करून ही माहिती दिली. फ्रेयाने 2022 मध्ये वनडे आणि 2023 मध्ये टी20 मध्ये पदार्पण केलं होतं तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 33 विकेट घेतल्या आहेत. वनडे फॉर्मेटमध्ये तिच्या नावावर 10, तर टी20 मध्ये तिने 23 विकेट घेल्या आहे. फ्रेया डेविसचा टी20मध्ये इकोनोमी रेट हा 6.84 इतका आहे. हा टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम मानलं जातं. इतकंच काय तर फ्रेयाने वुमन्स 100 मध्ये दोन संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. यात तिने 37 सामन्यात 36 विकेट घेतल्या आहे. या पर्वात तिने 8 सामन्यात 8 विकेट घेतल्या होत्या.. फ्रेया डेविसने वकिली करण्यासाठी क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

फ्रेयाची वकिली क्षेत्रातील वाट वाटते तितकी सोपी नाही. तिने ब्रायटन कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि एक्सेटर युनिवर्सिटीतून कायद्याची पदवी घेतली. आर्थिक कारणामुळे तिला अनेक क्रिकेटला प्राधान्य देण्यास अडचण आली. पण आई वडिलांच्या मदतीमुळे तिने क्रिकेट खेळलं. त्यानंतर 2017 मध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी क्रिकेटला ब्रेक दिला. त्यानंतर तिने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि सुपर लीग स्प्रधेत चांगली कामगिरी केली. दोन वर्षे टी20 संघातून बाहेर होती. तीन वर्षांपासून तिला वनडे संघात जागा मिळाली नाही. यामुळे तिने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

फ्रेया डेविसचा जन्म वेस्ट ससेक्सच्या चिचेस्टमध्ये 27 ऑक्टोबर 1995 साली झाला. वयाच्या 14व्या वर्षी तिने ससेक्स संघात पदार्पण केलं. वय कमी असल्याने तिला सिनियर काउंटी क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली नाही. ससेक्ससाटी फ्रेयाने पहिला विकेट इंग्लंडची दिग्गज खेळाडू शॅरलेट एडवर्ड्सला बाद केलं होतं. फ्रेयाची गोलंदाजीची धार पाहून क्रीडाप्रेमींनी तिचं कौतुक केलं. तिच्या खेळीच्या जोरावर ससेक्सने अनेक किताब जिंकले.2013 मध्ये वुमन्स काउंटी चॅम्पियनशिप जिंकला. 2019 मध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तिची सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये निवड केली. अनकॅप्ड खेळाडू असूनही तिला हा मान मिळाला होता.