AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 चेंडू आणि 5 विकेट्स..! पाकिस्तानचा भारताविरूद्ध झाडू प्लान फसला, झालं असं की..

आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला दुसऱ्यांदा पराभवाचा दणका दिला. भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत केलं. साखळी आणि सुपर 4 फेरीतील दोन्ही सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवची एक रणनिती कामी आली. सूर्यकुमारने फिरकीचा योग्य वापर केला.

20 चेंडू आणि 5 विकेट्स..! पाकिस्तानचा भारताविरूद्ध झाडू प्लान फसला, झालं असं की..
20 चेंडू आणि 5 विकेट्स..! पाकिस्तानचा भारताविरूद्ध झाडू प्लान फसला, झालं असं की..Image Credit source: ACC
| Updated on: Sep 22, 2025 | 7:52 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानला डोकंच वर काढू दिलं नाही. पाकिस्तानच्या डावात सुरुवातीला काही झेल सुटल्याने रणनिती फसली. पण त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने डोकं शांत ठेवून योजना अवलंबल्या. त्याचा परिणाम दिसून आला. पाकिस्तानने पावर प्लेमध्ये 1 गडी गमवून 55 धावा केल्या होत्या. तर दहा षटकात 1 बाज 91 अशी स्थिती होती. त्यामुळे पाकिस्तानची विकेटसोबत धावगती कमी करण्याचं आव्हान होतं. भारतीय फिरकीविरुद्ध पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती. आकडेवारीवरून कर्णधार सूर्यकुमार यादवला हे माहिती होतं. त्यामुळे त्याने फिरकी गोलंदाजांना विकेट मिळत नसली तरी धावगती कमी करण्याच्या हेतूने त्यांचा पुरेपूर वापर केला. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला फिरकी गोलंदाजांना तोंड देणे कठीण गेले. पाकिस्तानी खेळाडू फिरकीपटूंचा सामना करताना अनेकदा झाडू मारतात. म्हणजेच स्वीप शॉट्स खेळतात. पण यावेळी त्यांचं गणित चुकलं.

पाकिस्तानी फलंदाजांनी 20 चेंडूवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना 20 धावाही काढता आल्या नाहीत. पाकिस्तानी फलंदाज सहसा चौकार मारण्यासाठी स्वीप करतात. अनेकदा फिरकीसमोर पाकिस्तानी फलंदाज हे अस्त्र वापरतात. पण भारताची फिरकी इतकी प्रवाभी होती की त्यांना तसं करणं जमलंच नाही. भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध ते अपयशी ठरले. पाकिस्तानने 20 चेंडूत स्वीप मारत फक्त 18 धावा केल्या. पाकिस्तानने फिरकी गोलंदाजांना स्वीप करण्याच्या प्रयत्नात 5 गडी गमावले.

दुसऱ्या टी 20 सामन्यात कुलदीप यादवने फक्त 1 विकेट घेतली. पण त्याने धावांची गती रोखली. त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 31 धावा दिल्या. त्याच वेळी वरुणने चार षटकांमध्ये फक्त 25 धावा दिल्या. पण त्याला काही विकेट मिळाली नाही. पण सूर्यकुमार यादवचा प्लान यशस्वी ठरला. पाकिस्तानचा संघ चुकून अंतिम फेरीत समोर आला तर अशीच रणनिती असण्याची शक्यता आहे. पण यापूर्वी त्यांना श्रीलंकेविरुद्धचा सामना काहीही करून जिंकावा लागेल. कारण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.