
श्रीलंकेने इंग्लंडवर तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेने यासह इंग्लंडला त्यांच्यात घरात 10 वर्षांनी पराभूत केलं. त्यामुळे इंग्लंडचं श्रीलंकेला क्लिन स्वीप करता आलं नाही. मात्र त्यानंतरही इंग्लंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडवर टी 20I मालिकेत 3-0 अशा फरकाने मात केली. त्यानंतर आता इंग्लंड मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी 20 सीरिज एकूण 3 सामन्यांची असणार आहे. तर एकदिवसीय मालिकेत 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र त्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी 20I मालिकेला 11 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना 13 सप्टेंबरला पार पडेल. तर 15 तारखेला मालिकेची सांगता होईल.त्यानंतर 19 तारखेपासून वनडे सीरिजला सुरुवात होईल. तर 29 सप्टेंबरला पाचवा आणि अंतिम सामना पार पडणार आहे. त्याआधी इंग्लंडने एकदिवसीय संघात एकमेव बदल केला आहे. इंग्लंडच्या गस एटकीन्सन याला एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर एटकीन्सन याच्या जागी ओली स्टोन याचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
वनडे संघात एक बदल
⬅️ Gus Atkinson
➡️ Olly StoneWe’ve made one change to our ODI squad ahead of our upcoming series against Australia 🔄
— England Cricket (@englandcricket) September 9, 2024
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i सीरिजसाठी इंग्लंड टीम : फिल सॉल्ट (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, जॅकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिविंगस्टोन, साकिब महमूद, डॅन माउस्ली, जॅमी ओवर्टन, आदिल राशिद, रीसे टॉपली आणि जॉन टर्नर.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, ओली स्टोन, जॅकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, जोश हल, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, आदिल राशिद, फिल साल्ट, जेमी स्मिथ, रीसे टॉप्ले आणि जॉन टर्नर.