Joe Root चा कारनामा, सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, तिघांना पछाडत दिग्गज नंबर एक

Joe Root breaks Sachin Tendulkar World Record : इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 23 धावांच्या नाबाद खेळीसह सचिन तेंडुलकर याचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे.

Joe Root चा कारनामा, सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, तिघांना पछाडत दिग्गज नंबर एक
joe root break sachin tendulkar world record
Image Credit source: AP
| Updated on: Dec 01, 2024 | 11:54 AM

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम करतोय. रुट कधी रेकॉर्ड ब्रेक करतोय तर कधी वर्ल्ड रेकॉर्ड. रुट टीम इंडियाचा दिग्गज सचिन तेंडुलकरचे एक एक विक्रम मोडीत काढतोय. रुटने रविवारी 1 डिसेंबरला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पाचव्या दिवशी सचिनचा आणखी एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रुटने न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 104 धावांचा पाठलाग करताना 23 धावांची नाबाद खेळी केली. रुटने यासह इतिहास घडवला आहे. रुट कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सचिनला मागे टाकत अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

सचिनसह तिघांना पछाडलं

न्यूझीलंडने पहिल्या कसोटीतील तिसऱ्या डावात 254 धावा केल्या. तर इंग्लंडकडे 151 धावांची आघाडी होती. त्यामुळे इंग्लंडला 104 धावांचं माफक आव्हान मिळालं. इंग्लंड टीमने हे आव्हान 12.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. रुटने या दरम्यान 23 धावांची नाबाद खेळी केली. रुटने या छोट्या खेळीसह सचिनला वर्ल्ड रेकॉर्ड उद्वस्त केला. रुटने सचिनसह एलिस्टर कूक आणि ग्रेम स्मिथ या दोघांनाही मागे टाकलं. एलिस्टर कूक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. हा विश्व विक्रमआधी सचिनच्या नावावर होता. विशेष म्हणजे रुटने सचिनच्या तुलनेत 11 डावांआधी हा विश्व विक्रम आपल्या नावावर केला आहे.  कोणत्या फलंदाजाने चौथ्या डावात किती धावा केल्या आहेत? हे आपण जाणून घेऊयात.

चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • जो रुट : 1 हजार 630 धावा, 49 डाव
  • सचिन तेंडुलकर : 1 हजार 625 धावा, 60 डाव
  • एलिस्टर कूक : 1 हजार 611 धावा, 53 डाव
  • ग्रेम स्मिथ : 1 हजार 611 धावा, 41 डाव
  • शिवनारायण चंद्रपॉल : 1 हजार 587 धावा, 49 डाव

जो रुटकडून सचिन वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, टिम साउथी, मॅट हेन्री आणि विल्यम ओरुर्के

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर.