IND vs ENG : केएल राहुलमुळे ‘या’ खेळाडूला झटका, प्लेइंग ईलेव्हनमधून पत्ता कट, कोण आहे तो?

KL Rahul : केएल राहुल याला संधी देण्यासाठी 92 धावा करणाऱ्या मुंबईकर खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर.

IND vs ENG : केएल राहुलमुळे या खेळाडूला झटका, प्लेइंग ईलेव्हनमधून पत्ता कट, कोण आहे तो?
Karun Nair and Sarfaraz Khan
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 06, 2025 | 6:48 PM

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफीशियल सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील पहिला सामना हा अनिर्णित राहिला. तर दुसरा सामना 6 ते 9 जून दरम्यान काउंटी ग्राउंड, नॉर्थम्पटन येथे आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंड लायन्सने टॉस जिंकून या सामन्यात इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. इंडियाकडून या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल करण्यात आले आहेत. तर केएल राहुल याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाय. केएलमुळे पहिल्या सामन्यात 92 धावा करणाऱ्या मुंबईकर सर्फराज खान याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर व्हावं लागलं आहे.

केएल राहुल याचा इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. तर आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्ठात आल्यानंतर केएल राहुल याने रेड बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्फराज खान याला इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांसाठी संधी देण्यात आलेली नाही. अशात केएलमुळे सर्फराजला डच्चू दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी 3 खेळाडू कोण?

तसेच दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये मुंबईच्या तुषार देशपांडे  आणि तनुष कोटीयन या दोघांना संधी देण्यात आली आहे. तर खलील अहमद याचाही समावेश करण्यात आला आहे. या तिघांना हर्ष दुबे, हर्षित राणा आणि मुकेश कुमार यांच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आलीय.

पहिल्या सामन्यात काय झालं?

इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. इंडिया ए ने पहिल्या डावात 557 धावा केल्या. करुण नायर याने सर्वाधिक 204 धावांची खेळी केली. सर्फराज खान याने 92 तर ध्रुव जुरेलने 94 धावा केल्या. इंग्लंड लायन्सने प्रत्युत्तरात 587 रन्स करत 30 धावांची आघाडी घेतली.

त्यानंतर इंडिया ए ने दुसऱ्या डावात 41 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 241 रन्स केल्या. यशस्वी जयस्वाल याने 64 तर कर्णधार अभिमन्यू ईश्वरन याने 68 धावा जोडल्या. ध्रुव जुरेलने 53 आणि नितीश रेड्डी याने 52 धावांचं योगदान दिलं होतं.

इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), करुण नायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटीयन, अंशुल कंबोज, तुषार देशपांडे आणि खलील अहमद.