Karun Nair चा धमाका, इंग्लंड लायन्स विरुद्ध द्विशतकी खेळी, विराटच्या जागेसाठी दावा मजबूत
Karun Nair Double Century : करुण नायर याने रेड बॉल क्रिकेटमधील झंझावात कायम ठेवत इंग्लंड लायन्स विरुद्ध द्विशतक झळकावलं आहे. करुणने सामन्यातील दुसऱ्या दिवशी ही कामगिरी केली.

करुण नायर याला निवड समितीने टीम इंडियात 8 वर्षानंतर कमबॅकची संधी दिली. निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी करुणचा समावेश केला. टीम इंडियाच्या या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्याआधी इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहेत. करुण नायर याने दोन्ही संघांतील पहिल्या अनऑफिशियल टेस्टमध्ये इतिहास घडवला आहे. करुण नायरने सामन्यातील दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावलं आहे. करुण नायर याने या द्विशतकासह इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये विराट कोहली याच्या जागी दावा ठोकला आहे.
करुणची चाबूक बॅटिंग
करुणने इंडिया ए च्या डावातील 101 व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर फोर लगावला. करुणने यासह द्विशतक पूर्ण केलं. करुणने 272 बॉलमध्ये 74.63 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 203 रन्स केल्या. करुणने या द्विशतकी खेळीत 1 सिक्स आणि तब्बल 26 चौकार लगावले. करुणने या चौकार आणि षटकारच्या मदतीने 110 रन्स केल्या. तर करुणने इतर धावा या सिंगल-डबलच्या मदतीने पूर्ण केल्या.
करुण नायरला आणखी मोठी करण्याची संधी होती. मात्र करुण द्विशतकानंतर फक्त 1 धाव जोडल्यानंतर आऊट झाला. करुणला झमान अख्तर याने जेम्स र्यू याच्या हाती कॅच आऊट केलं. करुण 281 बॉलमध्ये 204 रन्स करुन आऊट झाला.
सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल नर्व्हस नाईंटीचे शिकार
दरम्यान टीम इंडिया एसाठी करुण व्यतिरिक्त सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. मात्र दोघांचीही शतकाची संधी हुकली. दोघेही नर्व्हस नाइंटीचे शिकार ठरले. ध्रुवने 120 बॉलमध्ये 11 फोर आणि 1 सिक्समध्ये 94 रन्स केल्या. तर सर्फराज खान याने 119 चेंडूत 13 चौकारांसह 92 धावा केल्या.
करुण नायरचा डबल धमाका
Karun Nair double century moment vs England Lions.
– He’s making his statement and grabbing opportunity with both hands. @karun126 – England suits Karun Nair. pic.twitter.com/fvlfcEfB9E
— Inside out (@INSIDDE_OUT) May 31, 2025
2016 साली इंग्लंड विरुद्ध त्रिशतक
करुण नायर याने रेड बॉल क्रिकेटमध्ये देशांतर्गत स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या आहेत. करुणला याच कामगिरीच्या जोरावर 8 वर्षांनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी संधी देण्यात आलीय. करुणने आतापर्यंत टीम इंडियाचं 6 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहेत. करुणने या 6 सामन्यांमध्ये 374 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे करुणने त्रिशतकही झळकावलं आहे. करुण टीम इंडियासाठी कसोटीत वीरेंद्र सेहवाग याच्यानतंर त्रिशतक करणारा पहिला फलंदाज आहे. करुणने 2016 साली ही कामगिरी केली होती. करुणने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 374 रन्स केल्या आहेत.
