
एशेज कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यातच इंग्लंडची नाचक्की झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंड या मालिकेसाठी तयारी करत होती. पण सर्व काही पाण्यात गेल्याचं दिसत आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-3 ने पिछाडीवर आहेत. असं असताना आता व्हाईट वॉशचं सावट इंग्लंड संघावर घोंघावत आहे. त्यामुळे उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकण्याचं मोठं आव्हान आता इंग्लंड संघावर आहे. असताना उर्वरित दोन सामन्यापूर्वीच इंग्लंडला धक्का बसला आहे. उर्वरित दोन्ही सामन्यातून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर बाद झाला आहे. त्यामुळे इंग्लंडला प्लेइंग 11 मध्ये दोन बदल करणं भाग पडलं आहे. मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबर 2025 पासून सुरु होईल. या सामन्यात ओली पोप खेळणार नाही. तर जेकब बेथेलने टीममध्ये स्थान मिळवलं आहे. तर जोफ्रा आर्चरल संघातून बाहेर गेल्याने त्याचा आता गस एटकिंसन घेणार आहे.
जोफ्रा आर्चर तिसऱ्या कसोटी सामन्यात साइट स्ट्रेनच्या दुखापतीने त्रस्त असल्याचं दिसून आलं. त्या दुखापतीतून सावरेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे त्याला मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांना मुकावं लागलं. दुसरीकडे, एलिलेडमध्ये ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण करणारा पॅट कमिन्स देखील उर्वरित दोन सामन्यांना मुकला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लियोन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मालिकेतून आऊट झाला आहे. असं असलं तर इंग्लंडच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत आहे. कारण ऑस्ट्रेलियावर आता मालिका गमवण्याचं कोणतंच सावट नाही. उलट इंग्लंडवरील दबाव वाढणार आहे. दरम्यान, उर्वरित दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद स्टीव्ह स्मिथ बजावणार आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.
England has made two changes for the Boxing Day #Ashes Test.
More details: https://t.co/Vd1tT4sRgA pic.twitter.com/TVGM7jJlNj
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2025
जॅक क्राउली, बेन डकेट, जॅकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), विल जॅक्स, गस एटकिंसन, ब्राइडन कार्स, जोश टंग.
स्टीव स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), ब्रँडन डोग्गेट, कॅमरून ग्रीन, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, टॉड मर्फी, माइकल नेसर, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, जेक वेदरलँड, ब्यू वेबस्टर.