T20 Blast : ‘हा’ तर IPL मध्ये हवा होता, 6,6,6,6,6,6,6, फक्त 41 चेंडूत धुवाधार बॅटिंग, VIDEO व्हायरल

T20 Blast : अबब, किती लांबलचक SIX मारला ते या व्हिडिओमध्ये बघा. टी 20 करीयरमधील पहिलं शतक झळकवलं. गोलंदाज स्वत:च्याच स्थितीवर वैतागलेले, कारण तो कोणालाच OUT होत नव्हता.

T20 Blast : हा तर IPL मध्ये हवा होता, 6,6,6,6,6,6,6, फक्त 41 चेंडूत धुवाधार बॅटिंग, VIDEO व्हायरल
chris cooke T20 Cricket
Image Credit source: twitter
| Updated on: Jun 01, 2023 | 11:57 AM

लंडन : गोलंदाज येत होते, तो त्यांची गोलंदाजी फोडून काढायचा. मैदानाचा एक असा कोपरा राहिला नाही की, जिथे त्याने बॉल पोहोचवला नाही. गोलंदाज स्वत:च्याच स्थितीवर वैतागलेले, कारण तो कोणालाच OUT होत नव्हता. इनिंग संपली पण तो नाबाद राहिला. त्याने आपल्या बॅटमधून तुफानी आणि टी 20 करीयरमधील पहिलं शतक झळकवलं. इंग्लंडच्या या विकेटकिपर फलंदाजाच नाव आहे, क्रिस कुक. तो 37 वर्षांचा आहे.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या T20 ब्लास्ट टुर्नामेंटमध्ये क्रिसची ही तुफानी बॅटिंग पहायला मिळाली. ग्लेमॉर्गन आणि मिडिलसेक्स या दोन टीममध्ये ही मॅच होती. क्रिस कुक ग्लेमॉर्गनच्या टीमकडून खेळत होता.

त्याने सगळ चित्रच पालटून टाकलं

ग्लेमॉर्गनला पहिली बॅटिंग करण्याची संधी मिळाली. त्यांची सुरुवात खराब झाली. स्कोर बोर्डवर 50 धावात 3 विकेट गेल्या होत्या. त्यानंतर क्रिस कुक मैदानात आला व त्याने सगळ चित्रच पालटून टाकलं. मैदानावर आल्यानंतर क्रिस कुकने टीमची स्थिती कशी आहे? याचा विचार केला नाही. समोर मिडिलसेक्सच्या टीमची हालत कशी खराब करता येईल? हा विचार त्याने केला. 37 वर्षाच्या या फलंदाजाची बॅटच सर्वकाही बोलली. त्याने मैदानात फोर-सिक्सचा पाऊस पाडला.

T20 करीयरमधील पहिलं शतक

क्रिस कुकने टी 20 करीयरमधील पहिलं शतक झळकवल. त्याने टी 20 मध्ये 6 वेळा अर्धशतक झळकवलय. पण कधी शतक झळकवल नव्हतं. हे त्याच्या टी 20 करीयरमधील पहिलं शतक होतं, ज्याचा टीमला फायदा झाला.


7 सिक्स, 12 फोर

क्रिस कुकने 41 चेंडूत 113 धावा फटकावल्या. 275 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने त्याने बॅटिंग केली. त्याने इनिंगमध्ये 7 सिक्स आणि 12 फोर मारले. त्याच्या या बॅटिंगच्या बळावर ग्लेमॉर्गनने 20 ओव्हर्समध्ये 3 विकेटवर 238 धावा केल्या. मिडिलसेक्सने 239 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न भरपूर केला. पण ते 29 धावा दूर राहिले. मिडिलसेक्सच्या टीमने 209 धावा केल्या. 30 रन्सनी त्यांचा पराभव झाला.