AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेब्रुवारीमध्ये घर जमीन आणि मालमत्ता खरेदी करायचीय, तर जाणून घ्या ‘हे’ शुभ मुहूर्त

ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मुहूर्त न पाहता मालमत्ता किंवा एखादी जमीन खरेदी करणे म्हणजे आर्थिक दृष्टया समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे. तर आजच्या लेखात आपण फेब्रुवारी 2026 मध्ये फ्लॅट, घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणते आहेत ते जाणून घेऊयात

फेब्रुवारीमध्ये घर जमीन आणि मालमत्ता खरेदी करायचीय, तर जाणून घ्या 'हे' शुभ मुहूर्त
property
| Edited By: | Updated on: Feb 09, 2026 | 12:27 PM
Share

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यक्रम करण्याआधी योग्य वेळ पाहणे जितकं महत्वाचं असतं तितकेच एखाद्या मोठी गोष्टीच्या खरेदीपूर्वी शुभ मुहूर्त पाहणे आवश्यक असते. असे मानले जाते की अशुभ वेळी वस्तू खरेदी केल्याने त्याचा नकारात्मक परिणाम व्यक्तीवर होऊ शकतो. समजा शुभ वेळ न पाहता एक फ्लॅट खरेदी केलात तर त्या वेळेचा वाईट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. यामुळे आयुष्यात ताणतणाव वाढू लागते. तसेच दररोज संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. अशा अनेक समस्या या निर्माण होत असतात.

ज्योतिषांच्या मते, अशुभ वेळेत खरेदी केलेली मालमत्ता असो वा इतर कोणतीही गोष्ट ही समस्या निर्माण करू शकते. जर तुम्हीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या लेखात आपण फेब्रुवारी 2026 मध्ये खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोण कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

फेब्रुवारीमधील शुभ मुहूर्त

12 फेब्रुवारी 2026: दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपासून ते 13 फेब्रुवारी सकाळी 6 वाजून 59 मिनिटांपर्यंत

13 फेब्रुवारी 2026: सकाळी 7 वाजून 04 मिनिटांपासून ते 14 फेब्रुवारी सकाळी 6 वाजून 58 मिनिटांपर्यंत

19 फेब्रुवारी 2026: सकाळी 6 वाजून 59 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 50 मिनिटांपर्यंत

20 फेब्रुवारी 2026: रात्री 08 वाजून 10 मिनिटांपासून ते 21 फेब्रुवारी सकाळी 06 वाजून 52 मिनिटांपर्यंत

26 फेब्रुवारी 2026 सकाळी 06 वाजून 52 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 09 मिनिटांपर्यंत

27 फेब्रुवारी 2026: सकाळी 10 वाजून 51 मिनिटांपासून ते 28 फेब्रुवारी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांपर्यंत

मालमत्ता खरेदी करताना ज्योतिषीय सल्ला का महत्त्वाचा आहे?

ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेतल्याने मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळते. तसेच खरेदी केलेल्या मालमत्तेत सकारात्मक ऊर्जा वाढविण्यास आणि ग्रहांच्या प्रभावांना संतुलित करण्यास मदत होते.

कोणता दिवस शुभ आहे?

गुरुवार आणि शुक्रवार हे आर्थिक आणि नोंदणीशी संबंधित कामांसाठी सर्वोत्तम मानले जातात, तर सोमवार ते शनिवार हे भूमिपूजन समारंभांसाठी योग्य असतात. रोहिणी, पुष्य, अनुराधा आणि रेवती सारखे नक्षत्र सकारात्मक वैश्विक उर्जेशी संबंधित आहेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?