
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. वूमन्स टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसरा सामना नियोजित वेळेनुसार आज 19 जुलैला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे तब्बल 4 तासांचा खेळ वाया गेला. त्यामुळे हा सामना पूर्ण 50 ओव्हरचा होणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
उभयसंघातील दुसऱ्या सामन्याला सुधारित वेळनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. इंग्लंड कर्णधार नॅट सायव्हर ब्रँट हीने फिल्डिंगचा निर्णय घेत भारतीय संघाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
वूमन्स टीम इंडियाने पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला होता. भारताने हा सामना दीप्ती शर्मा हीने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 4 विकेट्सने जिंकला. भारताने हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे भारताकडे आता लॉर्ड्समध्ये विजय मिळवण्यासह मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे. इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे उभयसंघात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
दरम्यान पावसामुळे सामन्यातील बराच वेळ वाया गेला. त्यामुळे नियमानुसार सामना वेळेत व्हावा यासाठी काही षटकं कमी करण्यात आली आहे. त्यानुसार हा सामना 50 ऐवजी 29 षटकांचाच होणार आहे. अर्थात पावसामुळे 21 ओव्हर कमी करण्यात आल्या आहेत.
पावसामुळे सामन्याला उशिराने सुरुवात
Good news from Lord’s 🏟️
Toss to take place at 2:30 PM Local Time (7 PM IST)
Start of play: 3 PM Local Time (7:30 PM IST)
It will be a 29-over match
Updates ▶️ https://t.co/ZeObbnYqoK#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/cMOTq1bqyv
— BCCI Women (@BCCIWomen) July 19, 2025
इंग्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : टॅमी ब्युमाँट, एमी जोन्स (विकेटकीपर), एम्मा लॅम्ब, नॅट सायव्हर-ब्रंट (कॅप्टन), सोफिया डंकले, मायिया बौचियर, एम अर्लॉट, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, लिन्से स्मिथ आणि लॉरेन बेल.
इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, स्नेह राणा, श्री चरणी आणि क्रांती गौड.