ENGW vs SLW Live Streaming : श्रीलंकेसमोर पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडचं आव्हान, मॅचला किती वाजता सुरुवात होणार?

England vs Sri Lanka Womens T20 World Cup 2026 Live Match Score: यजमान इंग्लंड क्रिकेट टीम वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 2 हात करणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

ENGW vs SLW Live Streaming : श्रीलंकेसमोर पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडचं आव्हान, मॅचला किती वाजता सुरुवात होणार?
ENG vs SL Nat Sciver Brunt and Chamari Athapaththu
Image Credit source: Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images and Francois Nel-ICC/ICC via Getty Images)
| Updated on: Jun 12, 2026 | 2:22 AM

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला शुक्रवार 12 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील पहिन्यात सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. यजमान इंग्लंड स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका असा सामना रंगणार आहे. चमारी अट्टापट्टू श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट हीच्याकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा आहे. यजमान असल्याने इंग्लंडला घरच्या परिस्थितीचा फायदा असेल यात दुमत नाही. त्यामुळे श्रीलंकेचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पहिल्याच सामन्यापासून चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निमित्ताने इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स सामना शुक्रवारी 12 जून रोजी होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स सामना बर्मिंघममधील एजबस्टनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंड श्रीलंकेवर वरचढ

टी 20i क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वुमन्स यांच्यात एकूण 12 सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने या 12 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. इंग्लंडने श्रीलंकेवर 10 सामन्यांत मात केली आहे. तर श्रीलंकेला केवळ 2  क्रिकेट सामन्यांतच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आकड्यांवरुन इंग्लंड श्रीलंकेवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं.

इंग्लंड-श्रीलंका 3 वर्षांनंतर आमनेसामने

दरम्यान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात अखेरचा टी 20i सामना हा 2023 साली खेळवण्यात आला होता. श्रीलंकेने तेव्हा इंग्लंडवर मात केली होती. श्रीलंकेने 17 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 117 धावा करुन सामना जिंकला होता.  त्यामुळे आता दोघांपैकी कोणता संघ वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us