AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Vs Afghanistan: टीम इंडियाच्या निवडीदरम्यान पाच मोठे निर्णय! हार्दिक पांड्याचं काय?

India vs Afghanistan: आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर लगेच टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात मालिका होणार आहे. ही मालिका 6 जूनपासून सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. पण हार्दिक पांड्याचं काय याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

India Vs Afghanistan: टीम इंडियाच्या निवडीदरम्यान पाच मोठे निर्णय! हार्दिक पांड्याचं काय?
India Vs Afghanistan: टीम इंडियाच्या निवडीदरम्यान पाच मोठे निर्णय! हार्दिक पांड्याचं काय?
| Updated on: May 19, 2026 | 3:26 PM
Share

India Squad for Afghanistan Series: आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. 31 मे रोजी अंतिम सामना होईल त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ आयपीएल स्पर्धेनंतर पहिली आंतरराष्ट्रीय मालिका अफगाणिस्तानविरूद्ध खेळणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ भारतात येणार असून एक कसोटी आणि तीन वनडे खेळणार आहे. ही दौरा 6 जूनपासून सुरू होईल. यासाठी टीम इंडियाच्या निवडीची घोषणा गुवाहाटीत होणार आहे. कसोटी आणि वनडे मालिकेसाठी निवड केली जाणार आहे. रिपोर्टनुसार, निवड समिती वनडे संघातून हार्दिक पांड्याला, तर कसोटी संघातून जसप्रीत बुमराहला वगण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त निवड समितीच्या बैठकीत काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या बाहेर कारण की…

भारतीय निवड समितीने हार्दिक पांड्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर ठेवण्याच निर्णय घेतला आहे. फिटनेसमुळे असा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्या पाठदुखीमुळे आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सविरुद्ध काही सामन्यांमध्ये खेळला नाही. सध्या त्याचावर उपचार सुरू असून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची निवड होणं कठीण दिसत आहे.

जसप्रीत बुमराहला आराम आणि शमीला संधी!

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहचा वर्कलोड मॅनेजमेंट करण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याला आराम देऊन मोहम्मद शमीला कसोटीत संधी देण्याची शक्यता आहे. निवड समितीचा हा दुसरा मोठा निर्णय ठरू शकतो.

सुदर्शनऐवजी पडिक्कलला संधी!

भारतीय निवड समिती देवदत्त पडिक्कलला कसोटी संघात संधी देऊ शकते. साई सुदर्शनची कसोटीतील कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे देवदत्त पडिक्कलचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. कारण देवदत्त पडिक्कलने देशांतर्गत रेड बॉल क्रिकेटमध्ये खूप साऱ्या धावा केल्या आहेत.

वनडे संघातून पंतला डच्चू!

ऋषभ पंतची बॅट काही चालत नाही. आयपीएल 2026 स्पर्धेतही फेल गेला. त्यामुळे त्याला वनडे संघातून बाहेर केलं जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, विकेटकीपर केएल राहुलला विकेटकीपर फलंदाज म्हणून संधी मिळू शकते. तर दुसरा विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि इशान किशनचा विचार केला जाईल. कारण हे खेळाडू फॉर्मात आहेत.

प्रिंस यादवला मिळणार संधी?

भारतीय निवड समितीचं वेगवान गोलंदाज प्रिंस यादवच्या कामगिरीकडे लक्ष आहे. त्यामुळे त्याला संधी देण्याचा विचार केला जात आहे. प्रिंस यादवने आयपीएल 2026 स्पर्धेत आपल्या वेगाने आणि व्हेरिएशनने प्रभावित केलं आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?