Team Bharat : देशाचं नाव भारत असावं की इंडिया! माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने स्पष्टच सांगितलं की…

Team Bharat : वीरेंद्र सेहवाग भारतीय क्रिकेट संघातील एक नावाजलेलं नाव..मैदानात असो की मैदानाबाहेर त्याने कायम दिलखुलासपणे बाजी मारली आहे. सध्या देशाचं नाव भारत असावं की इंडिया असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर वीरेंद्र सेहवाग याने दिलखुलास उत्तर दिलं आहे.

Team Bharat : देशाचं नाव भारत असावं की इंडिया! माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने स्पष्टच सांगितलं की...
Team Bharat : देशाचं नाव काय असावं? या प्रश्नावर वीरेंद्र सेहवाग याने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला...
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 05, 2023 | 4:02 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. असं असताना देशाचं नाव भारत की इंडिया याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. काही वर्षापूर्वी या संदर्भात सुप्रीम कोर्टात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका फेटाळून लावण्यात आली होती. आता पुन्हा एकदा भारत की इंडिया असा नावावरून चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी भारत या नावाला पसंती दिली आहे. तर इंडिया नाव असेल तर काय फरक पडतो, अशी काही जणांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने याबाबत आपलं रोखठोक मत मांडलं आहे. तसेच बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांना टॅग करून एक विनंती केली आहे. तसेच त्याने नेदरलँडचा दाखलाही दिला आहे. वीरेंद्र सेहवाग याच्या पोस्टवर आता कमेंट्सचा वर्षावर सुरु झाला आहे. कमेंट्समध्ये दोन्ही पद्धतीच्या प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.

“1996 मध्ये नेदरलँड संघ भारतात हॉलंड या नावाने वर्ल्डकप खेळण्यासाठी आला होता. 2003 मध्ये जेव्हा आम्ही पुन्हा भेटलो तेव्हा त्यांचं नाव नेदरलँड झालं होतं. आता तेच लागू आहे. बर्मा हे नाव ब्रिटीशांनी दिलं होतं आता त्याचं नाव म्यानमार आहे. अशीच बरी खरीखुरी नावं आता पुढे येत आहेत.”, असं वीरेंद्र सेहवाग याने म्हंटलं आहे.

“तुमचा ऊर अभिमानाने भरून यावा अशाच नावाचं मी समर्थन करेनं. आपण भारतीय आहोत. इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिलं आहे. त्यामुळे भारत हे नाव लागू केलं पाहीजे. मी बीसीसीआय आणि जय शाह यांना विनंती करतो की जर्सीवर भारत हे नाव असावं”, असं ट्वीट वीरेंद्र सेहवाग याने केलं आहे.

इतकंच काय तर टीम इंडियाचं घोषणा केल्यानंतर बीसीसीआयच्या ट्वीटवरही त्यांनी चूक दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. टीम इंडिया नाही तर टीम भारत असं लिहिण्याची विनंती केली. दुसरीकडे राजकारण करण्यास काहीच रस नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. दोन्ही निवडणुकीत भारतातील मोठ्या पक्षांसोबत होतो. मी खेळाडूच्या भावनेने हे पाहतो. त्यामुळे यात राजकारण आणि वैयक्तिक अहंकार आणण्याची गरज नाही.